आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योजकतेचे मंत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीमंत होण्यासाठी मोठी स्वप्ने पाहा. स्वप्ने पाहण्यासाठी नवीन कल्पना शोधा. कल्पना म्हणजेच फायंडिंग गॅप, मॅप, टॅप. गॅप म्हणजेच ग्राहकांची बाजारपेठेतील गरज. मागणी मोठ्या प्रमाणावर आहे, पण त्याला पुरवठा करणारे कमी. मॅप म्हणजेच तसे लोकेशन प्लेस शोधा. टॅप म्हणजे बाजारपेठ काबीज करा. भांडवलाची अडचण असल्यावर व्हेंचर कॅपिटालिस्ट शोधा.
नवीन कल्पना शोधण्यासाठी विद्या तशी मिळवा. विद्या तशी मिळवण्यासाठी संगत तशी धरा. संगत तशी धरण्यासाठी वातावरण तसे शोधा. वातावरणात नवीन कल्पना लक्षात आल्यास त्याला कायद्याचे संरक्षण द्या. तुमची कल्पना कायदेशीर झाल्यावर त्या कल्पनांचा गुणाकार करा व तो कारभार सांभाळण्यासाठी ध्येयवेडी माणसे संघटित करा. त्यांना प्रशिक्षण द्या आणि सर्वात महत्त्वाचे, तुमच्या कल्पना ग्राहकाला विकायला शिका. तुमचे विकण्याचे वेगळी पद्धत व नेटवर्क बनवा व ते माध्यम कॉम्प्युटर इंटरनेट, टीव्ही, न्यूज पेपर माध्यमातून 24 तास उपलब्ध ठेवा. तुमच्याजवळ असलेल्या रिसोर्सचा जास्तीत जास्त वापर करायला शिका. तुमच्या कल्पना या उच्चतम दर्जा आणि सेवेने उपलब्ध पाहिजे. तुमच्या स्वप्नामध्ये तुमच्याबरोबर समाजाचे हित लपलेले पाहिजे. तुमच्या कल्पनांचा वास्तविक जगामध्ये संख्यात्मक मागणी - पुरवठ्याच्या बाजारामध्ये सर्व्हे करा. ध्यानात ठेवा नवीन प्रकल्प, कल्पना या जगावर राज्य करतात. ज्ञानापेक्षा कल्पना या मोठ्या असतात. ज्ञानाला मर्यादा असतात. कल्पना या मर्यादेपलीकडे आहेत. कल्पना विकल्यानंतर तसेच अगोदर पैशाचे व वेळेचे व्यवस्थापन करायला शिका. तुमचा प्रकल्प हा युनिक पाहिजे. जोखीम घ्यायला शिका. शेवटी हिमतीचीच किंमत असते. तुमच्या स्वप्नाला व्यावहारिक जगामध्ये बदला व त्या ध्येयाचे व्हिजन अँड मिशन स्मार्ट ठरवा व सर्वात महत्त्वाचे तुम्हाला कमावलेल्या पैशाचे करायचे काय? जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही तोपर्यंत तुम्हाला पैसा कमावण्याची प्रेरणा तुम्हाला मिळू शकत नाही.