आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आकाश' मिळणार आता दुप्पट किंमतीत!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- जगातील सर्वात स्‍वस्‍त असलेल्‍या 'आकाश' टॅब्‍लेट कॉम्‍प्‍युटरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. आकाश बनवणा-या डेटाविंड कंपनीला 700 कोटी रूपयांची ऑर्डर आली आहे. इतक्‍या मोठया मागणीची पूर्तता करण्‍यासाठी कंपनीने उत्‍पादनास सुरूवात केली आहे. परंतु, पैशाच्‍या कमतरतेअभावी कंपनी आपल्‍या हिस्‍सातील 10 ते 15 टक्‍के हिस्‍सा विकणार आहे.

देशातील मोठमोठया कंपन्‍यांनी आकाशची मागणी केली आहे. ग्‍ेलनमार्क फार्मा, एचएफसीएल, सीनेट सॉल्‍युशन, मेदांता मेडिसिटी सारख्‍या कंपन्‍यांनी आपली मागणी नोंदवली आहे. अनेक मोठया महाविद्यालयानी देखील याची मागणी केली आहे, अशी माहिती डेटाविंडच्‍या मुख्‍य कार्यकारी सुनित सिंह तुली यांनी दिली.

सध्‍याच्‍या मॉडेलची किंमत 2500 रूपये इतकी आहे. त्‍यामध्‍ये सुधारणा करून दुप्‍पट किंमतीला विकण्‍याचा कंपनीचा विचार आहे. भारत सरकारने दहा हजार टॅब्‍लेट घेऊन देखील आतापर्यंत त्‍याचे पैसे दिलेले नाहीत. आयआयटी राजस्‍थानकडून हे पैसे येणे बाकी आहेत.
\'आकाश\' टॅबलेटसाठी ऍप बनविणार्‍याला मिळणार एक लाख रुपये