आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात येणार \'अलीबाबा\', ई-कॉमर्स क्षेत्रात वाढणार स्पर्धा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- चीनची सर्वात मोठी ऑनलाईन शॉपिंग कंपनी 'अलीबाबा'ची आता भारतावर नजर आहे. भारतात वेगाने वाढणार्‍या ई-कॉमर्सचा आवाका लक्षात घेऊन आलीबाबा लवकरच भारतात येण्याच्या तयारीत आहे. मार्चमध्ये आयपीओ आणण्याच्या घोषणेनंतर 'अलीबाबा'ने अमेरिकाच्या अ‍ॅमेझॉनला टक्कर देण्यासाठी ऑनलाईन रिटेल पोर्टल उघडले आहे. चीनच्या या कंपनीचे लक्ष आता भारतातील बाजारपेठेकडे असण्याची शक्यता आहे. अ‍ॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझॉस यांनी नुकतेच भारतात दोन अब्ज डॉलर गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली होती. तसेच भारतीय ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लीपकार्टनेही कंपनीच्या विस्तारासाठी 1 अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याचे सांगितले आहे. त्यामुळे आलीबाबा भारतात आल्याने भारतीय ऑनलाईन बाजारपेठेत मोठी स्पर्धा पाहायला मिळेल.
पुढील स्लाईडवर पाहा.... ''अलीबाबा'' कंपनीच्या निर्मितीची कथा