आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलीबाबा भारतीय एम-कॉमर्स बाजारात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चीनमधील अलीबाबा समूहाची सहयोगी कंपनी एंट फायन्शियल सर्व्हिसेस कंपनी आता वन -९७ कम्युनिकेशन्समधील २५ टक्के हिस्सेदारी घेणार आहे. वन-९७ पेटीम यानावाने भारतातील सर्वात मोठा एम-कॉमर्स प्लॅटफार्म चालवते. कंपन्यांनी यातील गुंतवणुकीचा खुलासा केलेला नाही. मात्र, सूत्रांच्या मते, ही गुंतवणूक ३००० कोटी रुपयांपर्यंत राहील.

एंट फायन्शियल प्रथमच एखाद्या भारतीय कंपनीत गुंतवणूक करणार आहे. ही कंपनी चीनमधील सर्वात मोठे ऑनलाइन सेवा देणा-या अलीपेचे संचालन करते. कंपनी पेटीमला तांत्रिक व धोरणात्मक मदत करणार आहे. एंट फायन्शियलचे उपाध्यक्ष साइरिल हान यांनी सांगितले, भारतातील स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. वन ९७ चे संस्थापक व सीईओ विजय शेखर शर्मा यांनी सांगितले, या व्यवहारामुळे आमच्या ग्राहकांना जास्त सुविधा मिळतील.

आयडीसीच्या मते, अलीबाबा २०१३ मध्ये जगातील सर्वात मोठी ऑनलाइन आणि मोबाइल कॉमर्स कंपनी होती. डिसेंबर २०१४ च्या तिमाही अलीबाबाच्या माध्यमातून १२७ अब्ज डॉलरची (७.७ लाख कोटी रुपये) विक्री केली आहे.