आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात येतेय १५ हजार कोटींची अलिबाबाची गुहा, स्नॅपडीलमध्ये गुंतवणूकीची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चीनमधील "अलिबाबा' या जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपनीचे संस्थापक जॅक मा यांनी भारतात मोठ्या गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, भारतातील उद्योजक व टेक्नॉलॉजी कंपन्यांसोबत काम करण्यास आपण इच्छुक आहोत.

उद्योगजगतातील फिक्की या संघटनेच्या कार्यक्रमात बोलत होते. सुमारे दीड लाख कोटी रुपयांची मालमत्ता व चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या जॅक यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.

सप्टेंबरमध्ये जगातील सर्वात मोठा २५ अब्ज डॉलर्सचा आयपीओ जारी करणारी अलिबाबा कंपनी भारतात चार वर्षांपासून व्यवसाय करत आहे. तथापि, भारतातील ई-कॉमर्स व्यवसायात तिचा वाटा अल्पसा आहे. चीनच्या ८० टक्के ई-कॉमर्स व्यवसायावर तिचा कब्जा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करून जॅक म्हणाले, एक उद्योजक या नात्याने मोदींची भाषणे मला प्रभावित करतात. दोन्ही देशांतील उद्योजकांनी एकत्र येऊन काम करण्याची ही योग्य वेळ आहे. जॅक म्हणाले, भारत मोबाइलची मोठी बाजारपेठ आहे. येथे ऑनलाइन व्यवसायाला चांगली संधी आहे. अलिबाबाशी अनेक भारतीय उद्योजक जोडलेले आहेत.

अलिबाबाची अजब गुहा
जॅक मा यांनी १९९९ मध्ये दक्षिण चीन प्रांताची राजधानी हँगझोऊ येथे अलिबाबाची स्थापना केली. आयडीसीच्या मते अलिबाबा जगातील सर्वात मोठी ऑनलाइन व मोबाइल कॉमर्स कंपनी आहे. चीनमध्ये कंपनीचे ३०७ अब्ज ग्राहक आहेत.

जॅकची श्रीमंती
अलिबाबाचे संस्थापक जॅक मा चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे ३० अब्ज डॉलरची (सुमारे १८५४ कोटी रुपये)संपत्ती आहे.

स्नॅपडीलमध्ये गुंतवणूक ?
भारतातील गुंतवणुकीसाठी जॅक मा स्नॅपडीलशी करार करतील, अशी चर्चा आहे. जपानच्या सॉफ्टबँकेचा अलिबाबामध्ये एकतृतीयांश हिस्सा आहे, तर सॉफ्टबँक स्नॅपडीलमधील सर्वात मोठा गुंतवणूकदार आहे.

भारतातील युवकांवर मदार
मी एक शिक्षक होतो. इंटरनेटने माझ्या जीवनात क्रांती आणली. इंटरनेट भारताला बदलणार हे छातीठोकपणे सांगू शकतो. येथील युवक परिवर्तन आणण्यात मोठी भूमिका निभावू शकतात. : जॅक मा, संस्थापक, अलिबाबा