आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Alibaba News In Marathi, Chinese E Commerce, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अलिबाबाचे खुल जा सिमसिम, आयपीओ हिट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - चीनची ई-कॉमर्स कंपनी अलिबाबाच्या शेअर्सचे शुक्रवारी न्यूयॉर्क शेअर बाजारात लिस्टिंग झाले. कंपनीचा शेअर ९२.७० डॉलरमध्ये (जवळपास ५,६३७ रुपये) खुला झाला आणि काही अवधीतच ९९.७० डॉलरच्या (सुमारे ६,०६३ रुपये) विक्रमी किमतीपर्यंत पोहोचला.
गुंतवणूकदारांमध्ये या शेअर्सबाबत एवढा उत्साह होता की पहिल्या दहा मिनिटांच्या व्यवहारात त्यांनी १० कोटी शेअर्सची खरेदी केली. अलिबाबाने आयपीओच्या साहाय्याने एका झटक्यात २५ अब्ज डॉलर(जवळपास १.५२ लाख कोटी रुपये) जमा केले. या आयपीओनंतर कंपनीचे बाजारपेठेतील मूल्य जवळपास १४ लाख कोटी रुपयांहून जास्त झाले. ही अ‍ॅमेझॉन आणि इबेसारख्या ऑनलाइन रिटेल कंपनीच्या बाजारमूल्यापेक्षा जास्त आहे. अलिबाबा जगातील १८ वी सर्वात मोठी कंपनी झाली आहे.

कर्मचारीही करोडपती
अलिबाबाच्या सहा हजार कर्मचा-यांकडे शेअर्स होते. यामध्ये त्यांच्या व्यवस्थापकापासून रिसेप्शनिस्टचा समावेश आहे. कंपनीचा आयपीओ हिट झाल्याचा फायदा या कंपनी कर्मचा-यांनाही होणार आहे.

जगातील अव्वल पाच आयपीओंमध्ये चीनचे तीन
* अलिबाबा : १.५२ लाख कोटी रुपये
* अ‍ॅग्रिकल्चर बँक ऑफ चायना - १.३४ लाख कोटी रुपये
* इंडस्ट्रियल अँड कमर्शियल चायना : बँक ऑफ चायना- १.३३ लाख कोटी रुपये
* एआयए हाँगकाँग - १.२४ लाख कोटी रुपये, जनरल मोटर्स - १.२२ लाख कोटी रुपये
* भारतात- २०१० मध्ये कोल इंडियाचा आयपीओ १५००० कोटी रुपयांत आला
* अलिबाबाच्या आयपीओचा भाव ६८ डॉलर प्रति शेअर होता. त्याची लिस्टिंग ३६ टक्के उसळीसह ९२.७० डॉलरमध्ये झाली. यानंतर तो ४६ टक्के उसळीसह ९९.७० डॉलरपर्यंत पाेहोचला.

चीनमध्ये ८० टक्के ऑनलाइन खरेदी अलिबाबा डॉट कॉमवरून
जॅक चीनचे सर्वात श्रीमंत : जॅक माने १७ मित्रांना सोबत घेऊन अलिबाबाची सुरुवात १५ वर्षांपूर्वी केली होती. एका मुलाखतीमध्ये जॅक म्हणाले होते, मी २००२ मध्ये हार्वर्डमध्ये भाषण दिले. माझ्या भाषणानंतर एका कंपनीच्या सीईओने मला वेडा ठरवले होते. मी त्याला अलिबाबामध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. अलिबाबामध्ये तीन दिवस घातल्यानंतर आपणाला आता जाणीव झाली असल्याचे त्याने कबूल केले. इथे काम करणारे १०० लोक माझ्यासारखेच वेडे आहेत. जॅक माची एकूण मालमत्ता जवळपास ८५१.३४ अब्ज रुपयांपर्यंत पाेहोचली आहे. ते चीनचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.