आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Alibaba Partners With Paytm To Enter Indian MCommerce Market

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ALIBABAची भारतात एंट्री; वाचा, जॅक मांचा भारतीय बाजारात येण्यामागील उद्देश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जगातील सगळ्यात मोठी आणि व्हॅल्‍युएबल ई-कॉमर्स कंपनी ALIBABA अखेर भारतीय ई-कॉमर्स बाजारात पाऊल ठेवले आहे. ALIBABA ने 'पेटीएम'ची मूळ कंपनी 'वन 97 कम्युनिकेशन'ची 25 टक्के भागिदारी खरेदी केली आहे.

'पेटीएम'मध्ये 25 टक्के भागिदारी खरेदी करण्‍यासाठी सुरुवातीला 20 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करावी लागते. या करारामुळे भारतातील छोट्या उद्योगांना चालना मिळणार आहे. तसेच भारतीय ई-कॉमर्स क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण होणार असल्याची शक्यता विशेषज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

15 अब्ज डॉलर्सचा होईल भारतीय ई-कॉमर्स बाजार...
'पीडब्‍ल्‍यूसी'च्या अहवालानुसार, सन 2016 पर्यंत भारतात ई-टेलिंग क्षेत्रात मोठी उलाढाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतीय ई-कॉमर्स बाजार 15 अरब डॉलर्सचा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडणार आहे. परिणाम ऑनलाइन खरेदीदारांची संख्‍या वाढून ती 10 कोटींवर पोहोचेल. सन 2020पर्यंत ऑनलाइन पेमेंटपैकी 30 टक्के हे मोबाइल आणि टॅबलेटच्या माध्यमातून अदा केले जातील. याच कारणामुळे ALIBABA ने 'पेटीएम'सोबत करार करून भारतीय बाजारात प्रवेश केला आहे.

या कारणामुळे भारतात गुंतवणूक करतोय ALIBABA...
'एएनटी फायनान्शियल'चे व्हाइस प्रेसीडेंट सायरिल हॅन यांच्यामते, भारतीय बाजाराकडे महत्त्वाची आणि सगळ्यात मोठी बाजारपेठ पाहिले जाते. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतील लोकसंख्या. चीनच्या पाठोपाठ भारताच्या लोकसंख्येत वाढ होत आहे. याशिवाय, भारतात स्‍मार्टफोन युजर्सची संख्या वाढत आहे. त्यात ऑनलाइन पेमेंट करणार्‍यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. 'पेटीएम' हे एक महत्त्वपूर्ण साधन आहे. त्यामुळे ALIBABA ने पेटीएमसोबत करार केला आहे.

काय करते 'पेटीएम'
पेटीएम हे भारतातील सगळ्यात मोठे मोबाइल कॉमर्स प्लॅटफार्म आहे. 'वन97 कम्युनिकेशन' ही 'पेटीएम'ची मूळ कंपनी आहे. अर्थात पेटीएम हे एक मोबाइल इंटरनेट फर्म आहे. प्रत्येक महिन्याला जवळपास 2.5 कोटी ऑर्डर पेटीएमच्या माध्यमातून दिल्या जातात. पेटीएमचे भारतात 2.3 कोटींहून अधिक मोबाइल वायलेट यूजर्स आहेत. मोबाइल रिचार्ज, तिकिटसह अन्‍य प्रकारची खरेदी करण्यासाठी पेटीएमने मोबाइल सुविधा उपलब्‍ध करून दिली आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, ALIBABA चे संस्थापक जॅक मा यांचा भारतीय बाजारात येण्यामागील उद्देश...