आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Alibaba\'s Jack Ma Second Is Richest Asian Among Mukesh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुकेश अंबानींना \'ओव्हर टेक\'करुन पुढे निघाले \'अलिबाबा\'चे जॅक मा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- चीनमधील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी 'अलिबाबा'ने आयपीओच्या माध्यमातून अमेरिका शेअर बाजारात सुमारे 25 अब्ज अमेरिकन डॉलर्सची कमाई करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यासोबत 'अलिबाबा'चे फाऊंडर आणि सीईओ जॅक मा यांनी आशियातील दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनण्याचा बहुमानही मिळवला आहे. जॅक मा यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांना मागे टाकले आहे.
50 वर्षीय जॅक मा यांनी भारतातील मुकेश अंबानी आणि हॉंगकॉंगमधील ली शाओ यांना मागे टाकून चीनमध्ये सर्वाधिक श्रीमंत आणि आशियात दुसर्‍या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीचा बहुमान प्राप्त केला आहे. जॅक यांची संपत्ती 26.5 अरब डॉलर्सच्या (जवळपास 1.6 लाख कोटी रुपये) घरात पोहोचली आहे.
दुसरीकडे, जॅक मा यांनी आशियातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीचा बहुमान मिळवला असला तरी हॉंगकॉंगमधील ली का शिन्ग यांच्या अजून मागे टाकले नसल्याचा दावा 'ब्लूमबर्ग बिलॅनियर्स इंडेक्स'ने केला आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, 'टॉप थ्री'मधून आऊट झाले मुकेश अंबानी...