आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • All Banks News In Marathi, All India Bank Officers Federation Banking

ऑल इंडिया बँक ऑफिसर्स फेडरेशनचा बँकिंग सुधारणांना विरोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशातील राष्‍ट्रीयीकृत बँकांचे अस्तित्व संपुष्टात आणण्याचे धोरणकर्त्याचे मुख्य उद्दिष्ट असल्याची टीका करत ऑल इंडिया बँक ऑफिसर्स फेडरेशनने बँकिंग क्षेत्रातील सुधारणांना तीव्र विरोध केला आहे. औद्योगिक संस्था, कॉर्पोरेट्स यांच्यासह खासगी क्षेत्राला बँक परवाना देण्याचे धोरण आणि विदेशी बँकांना प्रवेश देण्याचे उदार धोरण पोषक ठरणारे नाही, असे मत फेडरेशनचे महासचिव हरविंदर सिंग यांनी व्यक्त केले. कंपन्या आणि औद्योगिक संस्थांना बँका सुरू करण्याबाबत परवानगी देण्याबद्दलचे मत व्यक्त करताना सिंग म्हणाले की, बँकिंग उद्योगातील एकूण 2.30 लाख बुडीत मालमत्तांपैकी 59 टक्के एनपीए हा बड्या खातेदारांमुळे आहे. बँकिंग क्षेत्रातील कर्मचा-यांच्या वेतन फेररचनेसाठी होत असलेल्या विलंबामुळे नवीन खासगी आणि विदेशी बँकांना सार्वजनिक क्षेत्रातल्या अनुभवी कर्मचा-यांना हिरावून घेणे शक्य होणार असल्याचा आरोपही त्यांनी केला.


2008 मध्ये आलेल्या जागतिक आर्थिक मंदीच्या तडाख्यातही देशातल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका स्वत:च्या बळामुळेच तग धरू शकल्या. परंतु सध्याच्या जगभरातील आर्थिकदृष्ट्या डळमळीत परिस्थितीचा देशातल्या बँकिंग क्षेत्रावर आता चांगलाच परिणाम जाणवू लागला आहे, असेही ते म्हणाले.