आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • All Cooperation To Automobile, Union Minister Anant Geete Said

वाहन उद्योगाला सर्व सहकार्य, केंद्रीय मंत्री अनंत गिते यांची ग्वाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘मेक इन इंडिया’ या अभियानामध्ये स्वयंचलित वाहन उद्योगाचा मोठा वाटा आहे. या उद्योगाला आवश्यक त्या पायाभूत सुविधा तसेच इतर सहकार्य केंद्र सरकार करेल, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उद्योगमंत्री अनंत गिते यांनी बुधवारी पुण्यात केले.
द ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) तर्फे आयोजित ‘सियाट’ (सिम्पोयिजम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी २०१५) या स्वयंचलित वाहनांच्या तंत्रज्ञानविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेचे व प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून गिते बोलत होते. एआरएआयने चाकण येथे उभारलेल्या ‘पॅसिव्ह सेफ्टी लॅबोरेटरी’ तसेच कोथरूड येथील ‘फटिग लॅबोरेटरी’चे उद्घाटनही त्यांनी केले.

नॅट्रिपसाठी २२८० कोटींची तरतूद
केंद्र सरकारने स्वयंचलित उद्योगाला संशोधनात सहकार्य करण्यासाठी ‘नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्टिंग अँड रिसर्च आर अँड डी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट’ (नॅट्रिप) हा प्रकल्प सुरू केला आहे. त्यात २२८० कोटींची तरतूद केली आहे. त्याअंतर्गत देशभरात सात केंद्रे स्थापन केली असून पुण्याच्या एआरएआयचा समावेश आहे. मिश्र तंत्रज्ञानावार आधारित स्वयंचलित वाहने पुढे यावीत यासाठी केंद्र सरकारने ‘नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी प्लॅन’ तयार केला आहे.