आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्पन्नातील वाढीने रुंदावली आवड व आवाक्याची कक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात सर्वाधिक खप असलेल्या आल्टोचा विक्री दर यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी राहिला. म्हणजे लोकांना या गाडीत आता रस राहिला नाही. फक्त आल्टोच नव्हे तर देशातील इतरही छोट्या गाड्यांच्या बाबतीत अशीच परिस्थिती दिसून आली. छोट्या चारचाकी गाड्यांऐवजी 4 ते 7 लाख रुपये किमतीच्या मोठ्या गाड्यांकडे लोकांचा कल झुकल्याचे दिसून आले. तज्ज्ञांच्या मते याची दोन कारणे आहेत -
1. वाढलेली क्रयशक्ती : मॅकेन्झी ग्लोबल इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार देशाच्या लोकसंख्येत मध्यमवर्गीय समाज (वार्षिक 3.5 लाख ते 6 लाख रुपये उत्पन्न) 2005च्या तुलनेत चौपट झाला आहे. सात वर्षांपूर्वी 5 कोटी असलेली ही लोकसंख्या आता 20 कोटी झाली आहे. या लोकांची डिस्पोझेबल इन्कम (भौतिक सुविधांवर खर्च करण्याची क्षमता) वाढली आहे.
2. कर्जाचे सोपे मार्ग : एप्रिल महिन्यात रिझर्व्ह बँकेने कर्जाच्या व्याजदरात नगण्य कपात केली. तीन ते चार लाख रुपये कर्जाचा मासिक परतावा या कपातीमुळे सुमारे 100 रुपयांनी कमी झाला. पण लोकांनी या कपातीची फार चिकित्सा न करता चारचाकी खरेदीत उत्साह दाखवला. फॉक्स वॅगन कार्सचे संचालक नीरज गर्ग यांच्यानुसार भारतीय ग्राहक भावनाप्रधान आहेत. कर्जाच्या व्याजदरात कपातीचा ते सकारात्मक विचार करतात. त्यांच्या खर्चातून हे दिसते. विशेष म्हणजे देशातील जवळपास 70 टक्के कार खरेदी कर्जाच्या आधारे होते.