डेक्कन होंडात अमेझला / डेक्कन होंडात अमेझला मागणी

May 17,2013 04:59:00 AM IST

औरंगाबाद - नुकत्याच्या दाखल झालेल्या होंडाच्या 50 अमेझ कार अक्षय्यतृतीयेच्या शुभमुहूर्तावर ग्राहकांना सोपवण्यात आल्या. या वेळी होंडाचे सीनियर व्हाइस पे्रसिडेंट ज्ञानेश्वर सेन (विक्री व विपणन) उपस्थित होते.

ऑटोमोबाइलमध्ये डेक्कन होंडाने गेल्या 15 वर्षात नाव कमावले असून औरंगाबाद व पुण्यातील शाखांनी ठसा उमटवला आहे. औरंगाबाद येथे मल्टी बिझनेस सेंटर, औरंगाबाद शहर आणि वाळूज, तर पुण्यात पिंपरी, बंडगार्डन, धनकवडी (सातारा रोड) येथील डेक्कन होंडाच्या शाखा विक्री आणि पश्चात सेवा देत आहेत. होंडाने 11 एप्रिल रोजी आपली अमेझ ही पेट्रोल आणि डिझेल कार लाँच केली.

डेक्कन होंडामध्ये या कारला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अल्युमिनियम इंजिन, आकर्षक रचना, सुटसुटीत अंतर्गत सजावट, अधिक सुरक्षित आणि मजबूत आदी वैशिष्ट्यांमुळे ग्राहक अमेझला पसंती देत आहेत.

X