आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amazing Bicycle Running 200 Kilometers In 1 Leter Petrol

राजकमलने साकारली एक लिटर पेट्रोलमध्ये 200 किलोमिटर धावणारी सायकल!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: एक लिटर पेट्रोलमध्ये 200 किलोमीटर धावणारी सायकल)

महेसाणा- गुजरातमधील एका होतकरु तरुणाने पेट्रोलवर धावणारी अनोखी सायकल तयार केली आहे. विशेष म्हणजे ही सायकल एक लिटर पेट्रोलमध्ये दोनशे किलोमीटर अंतर कापते.

राजकमल असे या तरुणाने नाव असून त्याने या सायकलचे डिझाइन केले आहे. राजकमल माऊंट अबु येथे शासकीय नोकरी करतो. ग्रामिण भागातील लोकांची गरज ओळखून या सायकलचे डिझाइन तयार केल्याचे राजकमलने सांगितले. राजकमल याने ऑटोमोबाइलमध्ये पदवी घेतली आहे. सायकलचे डिझाइन तयार करण्‍यासाठी त्याला तीन वर्षांचा कालावधी लागला. सायकलला हेडलाइट देण्यात आला आहे. त्यामुळे ही सायकल रात्री देखील वापरता येईल.

अन्य स्पेसिफिकेशन...
- 80 सीसीचे टू स्ट्रोक असेम्बल इंजिन
- ताशी 40 ते 50 किलोमीटर वेग
- पॅडल मारल्यानंतर क्लच सोडल्यानंतर होते स्टार्ट
- दोन लिटर क्षमता पेट्रोलची टाकी
- पेट्रोल संपल्यानंतर पॅडलने देखील चालवता येते.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा पेट्रोलवर धावणार्‍या सायकलचे छायाचित्रे...