आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Amazing Facts About Alibaba’S Jack Ma, Who Failed To Land A KFC Job

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'अलिबाबा\'चे चेयरमन जॅक मा यांना एकेकाळी KFC नेही दिली नव्हती नोकरी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: 'अलीबाबा'चे चेयरमन जॅक मा)

नवी दिल्ली- चीनमधील सुप्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी 'अलिबाबा'ने अवघ्या 24 तासांत सुमारे 1320 अब्ज रुपयांची (21.8 अब्ज अमेरिकन डॉलर) कमाई केली आहे. अमेरिकी शेअर बाजारात 'अलिबाबा' ग्रुप होल्डिंग लिमिटेड कंपनीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आयपीओच्या माध्यमातून अलिबाबाचे चेयरमन जॅक मा यांनी अल्पावधीत तुफान पैसा कमावला आहे. जॅक मा या चीनमधील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीला एकेकाळी फास्ट-फूड रेस्ट्रॉ केएफसीनेही नोकरी दिली नव्हती.
'अलिबाबा'ची सुरुवात 1999 मध्ये चीनमधील हॅंग्जूमधील जॅक मा यांच्या घरातून झाली होती. स्थापनेच्या 15 वर्षांनंतर कंपनीच्या 'आयपीओ'ने उद्योग क्षेत्रात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. 'अलिबाबा'ने आपल्या एका शेअरची किमत 4080 रुपये (68 अमेरिकन डॉलर्स) इतकी आहे. अलिबाबाच्या शेअरची किमत 'अमेजन' आणि 'ईबे'पेक्षा अनेक पटींनी जास्त आहे. तरी देखील 'अलिबाबा' रेकॉर्डब्रेक ‍प्रतिसाद मिळत आहे.

'ब्लूमबर्ग बिलिनेयर्स इंडेक्स'नुसार, जॅक मा यांच्याकडे 21.8 अब्ज अमेरिकन डॉलर्स संपत्ती आहे. मात्र, जॅक मा यांचे सुरुवातीचे आयुष्य फारच संघर्षपूर्ण राहिले आहे. 'केएफसी'ने देखील जॉक यांना नोकरी देण्यास नकार दिला होता.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, जॅक मा यांच्या आयुष्याविषयी रोचक गोष्टी...