आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING WEBSITES: इंग्रजी भाषेवर पकड मिळवण्‍यासाठी अत्‍यंत उपयुक्‍त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

www.ego4u.com: बोलण्याइतकी इंग्रजी अनेकांना येत असते. पण इंग्रजीत आपली मते लिहिताना अनेकांना अडचणी येतात. व्याकरणविषयक समस्यांचा सामना करावा लागतो. जर तुम्हाला इंग्रजी भाषेवर पकड मिळवायची असल्यास त्यासाठी व्याकरण चांगले असणे आवश्यक असते. ठरावीक फीस आकारून इंग्रजीचे धडे देणार्‍या अनेक साइट इंटरनेटवर उपलब्ध आहेत. पण मोफत इंग्रजी शिकायाचे असल्यास इगोफॉरयू ही साइट एक चांगला पर्याय आहे.

या साइटच्या मदतीने तुम्ही इंग्रजीवर चांगली पकड मिळवू शकता. साइटवर प्रत्येक टॉपिक सविस्तरपणे सांगण्यात आला आहे. साइटवरुन आपण काय शिकलो याची चाचणी सुद्धा देऊ शकतो. भाषा सुधारण्यासाठी आवश्यक असणारे स्टडी मटेरियल याठिकाणी उपलब्ध होते. साइटचे वैशिष्ट्ये म्हणजे मनोरंजक पद्धतीने शिकवण्याची स्टाइल.