आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING WEBSITES: फ्री लान्‍स प्रोग्रामर साठी उपयुक्‍त Rent a coder.com

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही जर फ्रीलान्सर प्रोग्रामर असाल आणि स्वत:चे काम आऊटसोर्स करणार असाल तर ही वेबसाइट मदतीची ठरू शकते.जगभरातील संगणक प्रोग्रामर तज्ज्ञांना स्वत:चे उत्पादन विकण्यासाठी हा जागतिक फ्री लान्स बाजार आहे. या वेबसाइटच्या मदतीने ग्राफिक्स डिझाइन,लेखन,ट्रांसलेशन आणि इतर माहितीची देवाणघेवाण करता येते. वेबसाइटच्या साहाय्याने संपर्क वाढवून काम करता येते किंवा फ्री लान्स पद्धतीने काम करू शकता.या वेबसाइटवर काम करण्याचे चार टप्पे आहेत.

पहिल्या टप्प्यात येथे रजिस्ट्रेशन करून प्रोजेक्ट पोस्ट करावा लागतो. त्यानंतर प्रोजेक्टवर बोली लागण्याची वाट पाहावी लागते. तिसर्‍या टप्प्यात कामाला चांगला मोबदला मिळाल्यास कंपनीला किंवा व्यक्तीला प्रोजेक्ट देता येतो. अंतिम टप्प्यात काम पूर्ण केले जाते. काम पूर्ण आणि घेणारा व्यक्ती संतुष्ट झाल्यानंतर पैसे मिळतात.