(छायाचित्रः अॅमेझॉन फायर स्मार्टफोन)
गॅजेट डेस्कः ऑनलाईन शॉपिंगसाठी जगप्रसिध्द असलेल्या अॅमेझॉन कंपनीने नुकताच 3D स्मार्टफोन लॉन्च केला. या फोनमधील अनेक आकर्षक फिचर्समुळे हा तरूणांना आकर्षित करण्यास यशस्वी होऊ शकतो. अॅमेझॉनने 'Fire' या स्मार्टफोनसाठी AT&T सोबत दोन वर्षांचा करार केला आहे. या करारा अंतर्गत ग्राहकाला हा 32 GB मेमरी क्षमतेचा हा स्मार्टफोन $ 199 (जवळपास 11919.11 रुपये) आणि 64 GB मेमरी क्षमतेचा $ 299 (जवळपास 17908 रुपये) ला मिळणार आहे.
अॅमेझॉनचा हा स्मार्टफोन 25 जुलै रोजी बाजारपेठेत येणार आहे. या स्मार्टफोनसोबत एक वर्षाची वॉरंटीही दिली आहे.
काय वैशिष्ट्ये आहेत FIRE चे-
3D स्मार्टफोन - या फोनची स्क्रीन ही 3D आहे. तसेच अत्यंत कमी किंमतीत विशेष तंत्राचा वापर करून युजरला थ्रीडी चष्म्याशिवाय स्क्रीनवर 3D पाहता येईल.
4 फ्रंट कॅमेरा - हे 3D तंत्रज्ञान सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर दोघांच्या मदतीने बनवण्यात आले आहे. या फोनमध्ये 4 कॅमेरा सेंसर हे फोनच्या समोरील बाजूस देण्यात आले आहेत.
त्याचबरोबर LED इंफ्रारेड लाईटही देण्यात आली आहे. फोटोला 3D इफेक्ट देण्यासाठी हे कॅमेरे कोणत्याही फोटोच्या प्रत्येक अॅंगलला लक्षात घेऊन त्याला योग्य अशा 4 अॅंगलचे 4 फोटो एकत्र जोडून दाखवतील. यामुळे युजर्सला 3D फोटो दिसेल.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या FIRE चे इतर फिचर्स...