आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • America Federal Reserve Effect: Rupee Strong, Sensex Great Forward

अमेरिकी फेडरल रिझर्व्ह परिणाम: रुपयाला बळ, सेन्सेक्सची झेप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आर्थिक पॅकेजमध्ये सध्याच कोणतीही कपात होणार नसल्याची घोषणा अमेरिकी फेडरल रिझर्व्हने करताच भारताच्या बाजारात उत्साह निर्माण झाला. गुरुवारी सेन्सेक्स 684 अंकांनी वधारून 20,647 वर पोहोचला. तीन वर्षांतील हा विक्रम ठरला. याआधी 10 नोव्हेंबर 2010 रोजी सेन्सेक्स या पातळीवर होता.

दुपारी तर सेन्सेक्सने 775 अंकांपर्यंत उसळी घेतली होती. परंतु बाजार बंद होण्याच्या वेळी काहीशी घसरण झाली. निफ्टीची उसळी 216 अंकांची होती. गुंतवणूकदारांना एका दिवसात 1.84 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनीही 3500 कोटी रुपये बाजारात गुंतवले. त्यातच रुपयाही दिवसभरात 161 पैशांनी मजबूत झाला. म्हणजेच एका डॉलरची किंमत 61 रुपये 77 पैसे झाली. एका दिवसात वाढ 2.54 टक्के बळकटी आली. गेल्या महिन्यात एक डॉलर 68.85 रुपयांवर गेला होता.


आंतरराष्ट्रीय बाजारही बहरला
फेडरल रिझर्व्हच्या घोषणेमुळे युरोपीय बाजारातही उत्साहाचे वातावरण आहे. एफटीएसईचा शेअर 1.5 टक्क्यांनी,तर सीएसी आणि डीएएक्सच्या शेअर्सचा भाव 1 टक्क्यांनी वाढला. निक्की, हँगसँग या बाजारांतही 1.5 टक्के तेजी आली.
अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या घोषणेमुळे बाजारात उत्साह रिअल इस्टेटमध्येही धूम इंडियाबुल्स रिअल इस्टेट, युनिटेक, डीएलएफ, गोदरेज प्रॉपर्टीज, एचडीआयएल या कंपन्यांच्या शेअर्सनी 9.5 टक्क्यांची उसळी घेतली.
बँकिंग सेक्टरची बाजारात लूट : येस बँकेचे शेअर्स 23 टक्क्यांनी तर युनियन बँक, पीएनबी, बँक ऑफ बडोदा, एसबीआय, आयसीआयसीआय, एचडीएफसी या बँकांचे शेअर्स 10.5 टक्क्यांनी वधारले.


तेजीची दोन मुख्य कारणे
1. अमेरिकी फेडरल रिझर्व्ह : या मध्यवर्ती बँकेने आर्थिक पॅकेजमध्ये कपात होणार नसल्याची घोषणा केली. अमेरिकेची आर्थिक स्थिती सुधारली आहे. त्यातून दरमहा देण्यात येणारी 85 अब्ज डॉलरची सवलत मागे घेतली जाण्याचे संकेत होते.
2. रिझर्व्ह बँक गव्हर्नर : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन शुक्रवारी पहिल्यांदाच तिमाही पतधोरण आढावा जाहीर करणार आहेत.

सोने -चांदी चकाकले
जागतिक बाजारात डॉलरचे मूल्य घसरल्याचा फायदा सराफा बाजाराला झाला. नवी दिल्ली सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 410 रुपयांनी वाढून 30,810 झाले. चांदीने किलोमागे 990 रुपयांची वाढ नोंदवत 51,200 असा भाव नोंदवला. न्यूयॉर्क सराफ्यात सोन्याने औंसमागे 1360.30 डॉलरपर्यंत मजल मारली.

फेडरल धोरण बदलणार?
अमेरिकी फेडरल रिझर्व्ह दर महिन्याला आपल्या धोरणाचा आढावा घेते. फेडरल बँकेचे अध्यक्ष पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. नवे अध्यक्ष कदाचित नव्याने धोरण आखतील. त्यामुळे सध्या शेअर बाजारात असलेली तेजी किती दिवस टिकेल, हे सांगता येणार नाही.