आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • America\'s Tallest Building One World Trade Center Photos

ही बिल्डिंग इतकी उंच आहे, की तिचा वरचा भाग नेहमी असतो आभाळात!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा सगळ्यात उंच 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' उभारण्याचे जाहीर केले आहे. दुसरीकडे अमेरिकेतील सगळ्या उंच बिल्डिंगने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. 'वन वर्ल्ड ट्रेड सेंटर' नावाने उभारण्यात आलेली ही बिल्डिंग संपूर्ण जगाचे बिझनेस सेंटर आहे. सुमारे 24 हजार 800 कोटी रुपये या बिल्डिंगच्या निर्मितीवर खर्च करण्यात आले आहेत.

'वन वर्ल्ड ट्रेड सेंटर' इतके उंच आहे, की तिचा वरचा भाग नेहमी आभाळात असतो. टॉप फ्लोअरवरून एखादी वस्तू खाली फेकली तर तिला जमिनीवर पडायला खूप तास लागतात. आता या गगनचुंबी बिल्डिंगचे 'फ्रीडम टॉवर' असे नामकरण करण्यात आले आहे.

पोर्ट ऑथेरिटी ऑफ न्यूयॉर्क आणि तिशमॅन कन्स्ट्रक्शनद्वारा या बिल्डिंगची निर्मिती करण्‍यात आली आहे. स्कीडमोर कंपनीचे डेव्हिड याने बिल्डिंगचे डिझाइन तयार केले आहे. या बिल्डिंगमध्ये जगभरातील नामांकीत कंपन्यांचे 20 हजार पेक्षा जास्त ऑफिसेस आहेत. मात्र आतापर्यंत केवळ 60 टक्के ऑफिस सुरु झाले आहे.

न्यूयॉर्कमध्ये 542 मीटर उंच फ्रीडम टॉवर पश्चिम गोलार्धातील सगळ्यात उंच बिल्डिंग आहे. या टॉवरने शिकागोमधील विलिस टॉवरलाही मागे टाकले असल्याची माहिती काउंसिल ऑफ टॉल बिल्डिंग आणि अर्बन हॅबिटेट (सीटीबीवूएच) ने दिली आहे.

सीटीबीयूएनुसार, फ्रीडम टॉवर ही जगातील तिसर्‍या क्रमांकाची उंच बिल्डिंग आहे. दुबई येथील बुर्ज खलीफा बिल्डिंगचा पहिला क्रमांक लागतो तर सउदी अरब मक्का येतील स्थित मक्का रॉयल क्लॉक टॉवरचा दुसरा क्रमांक लागतो.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, गगनचुंबी बिल्डिंगची अद्‍भूत छायाचित्रे...