आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या \'मित्राने\' वाचवली आमीरची अब्रू; जाणून घ्या या मित्राबद्दल...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पीके चित्रपटात आमीरने वापरलेला रेडिओ ट्रांजिस्टर)
गॅजेट डेस्क - मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या 'धूम 3' या चित्रपटाने बॉलिवूड सुपरस्टार आमीर खानला चांगलीच प्रसिध्द मिळवून दिली होती. त्यावेळी या चित्रपटातील स्टंट आणि आमीरची आकर्षक बॉ़डी हा मुख्य चर्चेचा विषय होता. मात्र यावेळी आमीर काही दुसर्‍याच कारणामुळे चर्चेत आहे. याचे कारण आहे, आमीरचे यावेळचे 'पीके' चित्रपटाचे पोस्टर. चित्रपटाच्या पोस्टरसाठी एखाद्या अभिनेत्याने न्यूड पोझ दिली हे बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच घडले आहे. या पोस्टरवर आमीर रेल्वेच्या रुळावर उभा आहे. या पोस्टरमध्ये आमीरच्या हातात केवळ एक 2-in-one (Panasonic RQ-565D) दिसत आहे.
आमीरचे हे पोस्टर आपल्याला 50-60 च्या दशकातील रेडिओ ट्रांजिस्टरची आठवण करून देते. यापूर्वीही आमीर त्याचा चित्रपट 'पीके' साठी अनेकदा या ट्रांजिस्टरसमवेत दिसला आहे. या चित्रपटाच्या पटकथेत या ट्रांजिस्टरचे काय महत्त्व आहे हे तर चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. मात्र एक गोष्ट तर पक्की आहे की आमीरचा हा मित्र चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत नक्कीच असेल. रेडीओ ट्रांजिस्टर जवळपास 50 वर्षांपूर्वी लोकांसाठी खुपच महत्त्वाचे होते.
केव्हा झाली या ट्रांजिस्टरची सुरूवात
1947 मध्ये पहिल्यांदा बेल लॅब्स यांनी ट्रांजिस्टर बनवले होते. यानंतर वेगवेगळ्या कंपन्यांनी यावर संशोधन करून नवनवीन ट्रांजिस्टर बाजारात आणले. ट्रांजिस्टरमध्ये सर्वात जास्त संशोधन आणि टेक्नॉल़ॉजीचा विकास जपानने केला. 1956 पासून ते 1963 पर्यंत जपानने अनेक ट्रांजिस्टर बनवले. हिताची, ग्लोबल, जेफर, आयवा अशा अनेक कंपन्यांनी आपापल्या पध्दतीने ट्रांजिस्टर मॉडेल लॉन्च केले. यानंतर आलेल्या सोनीने 1957 मध्ये आपले पहिले TR-63 ट्रांजिस्टर रेडियो लॉन्च केला. भारतामध्ये सोनीचा हा ट्रांजिस्टर खुपच लोकप्रिय होता.
विंटेज रेडिओ ट्रांजिस्टर अजूनही अनेक लोकांना आकर्षित करतात. इबे आणि अनेक ऑनलाईन रिटेल वेबसाईट्सवर हे ट्रांजिस्टर चांगल्या किंमतीत विकताना दिसतात. Divyamarathi.com तुम्हाला अशाच काही जुन्या ट्रांजिस्टर रेडिओबद्दल सांगणार आहे.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या या ट्रांजिस्टरबद्दल...
सोर्स- http://www.radiomuseum.org/