आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Bachchan Buys 1.1 Lakh Shares In Stamped

बिग बी’ने केली एक लाख समभागांची खरेदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलीवूड स्टार अमिताभ बच्चनने स्टॅम्पेड कॅपिटल या ब्रोकरेज कंपनीमधील 1.1 लाख समभाग अंदाजे सव्वा कोटी रुपयांना खरेदी केले असल्याचे मुंबई शेअर बाजाराकडे उपलब्ध असलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे.
बिग बीने प्रति समभाग सरासरी 109.92 रुपये याप्रमाणे 1.21 कोटी रुपयांना ही खरेदी केली आहे. महिनाभरामध्ये कंपनीच्या समभाग किमतीत 30 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. बुधवारी दुपारच्या सत्रात स्टॅम्पेडचा भाव 114.90 रुपये होता. अगोदरच्या किमतीच्या तुलनेत त्यात 4.45 टक्क्यांनी वाढ झाली. केवळ स्टॅम्पेडच नाही तर अमिताभ बच्चन यांनी याअगोदर जस्ट डायल या आणखी एका नोंदणीकृत कंपनीतील 62,794 समभाग म्हणजे 0.9 टक्के हिस्सा खरेदी केला होता. या कंपनीच्या ‘आयपीओ’च्या वेळी बच्चन यांना 2011 मध्ये प्रत्येकी 10 रुपये याप्रमाणे 62,794 समभागांचे वाटप करण्यात आले. कंपनीने आपल्या डिस्क्लोजरमध्ये ही माहिती दिली आहे.