आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...आणि व्हॉट्स अ‍ॅपही बोलका झाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई । ‘वी चॅट’ आणि ‘लाइन’ला टक्कर देण्यासाठी आता ‘व्हॉट्स अ‍ॅप’च्या ‘व्हॉइस मेसेज’ची नवीन भर पडली आहे. या कंपनीने महिन्याला तिनशे कोटींपेक्षा जास्त सक्रिय वापरकर्त्यांचा टप्पा ओलांडला असल्याचे म्हटले आहे.
व्हॉट्स अ‍ॅपच्या नव्या सुविधेमुळे वापरकर्त्याला संपूर्ण मेसेज टाइप करण्याऐवजी बटण प्रेस करून आपला मेसेज रेकॉर्ड करता येईल. हा मेसेज पाठवायचा की नाही हे वापरकर्ता ठरवेल. तो मेसेज सेंट क्लिक करून पाठवता येईल, तर डिलिट करायचा असल्यास डाव्या बाजूस स्वीप केल्यास तो व्हॉइस मेसेज डिलिट होईल. रिसिव्ह चॅटमधूनही एका ‘टॅप’ने एखादा व्हॉइस मेल डिलिट करता येईल.


अँड्रॉइड, आयफोन, ब्लॅकबेरी, विंडोज फोन आणि नोकिया फोनवर ही व्हॉइस मेसेजिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. देशात ‘व्हॉट्स अ‍ॅप’चे 20 कोटी वापरकर्ते असून असून या नव्या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.


सुविधेची वैशिष्ट्ये
व्हॉइस मेसेजसाठी वेळेची मर्यादा नाही. हव्या तितक्या वेळेचा मेसेज रेकॉर्ड करता येणार आहे. मोबाइल कानापासून लांब धरला तर तो आपोआपच स्पीकर मोडवर जाईल. मात्र, तो जर कानाजवळ पकडल्यास आवाज कमी होईल. मेसेजचा आवाज आपोआप नियंत्रित होईल. मेसेज समोरच्याने ऐकला की नाही हे समजणार. मेसेज वाचला तर तो निळ्या बटणाने दर्शवला जाईल.