आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Android 5.0 L Os Launched, Features And Specifications

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाँच झाली अँड्रॉइड 5.0 'L', जाणून घ्या या नवीन OS ची वैशिष्टये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- अँड्रॉइड 5.0 कॉन्सेप्ट)
गॅझेट डेस्क- गुगलची i/O डेव्हलपर्स कॉन्फरन्स 2014 (25-26 जून) सध्या सॅन फ्रान्सिस्को येथे चालू आहे. या कॉन्फरन्समध्ये काहीतरी खास घडणार याची शक्यता वर्तवली जात होती. ती आता खरी होताना दिसत आहे. आता या सर्च जायंटने आपली नवीन ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉइड 5.0 'L'(अफवांनुसार याचे नाव लॉलिपॉप असे आहे, परंतू कंपनीने याबाबतीत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही) जगासमोर आणली आहे. अँड्रॉइडचे प्रमुख सुंदर पिचाई यांनी या ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल सांगितले. सध्या या ऑपरेटिंग सिस्टीमचे डेव्हलपर आवृत्ती सादर करण्यात आली आहे.
ही ऑपरेटिंग सिस्टीम अपेक्षेप्रमाणे डिझाईनवर आधारित आहे. डिझाईनिंगसोबतच डिझायनर्ससाठीदेखील नवीन नोटिफिकेशन सिस्टीममध्ये अनेक सुविधा आहेत. युझर्ससाठी काही फीचर्स टाकण्यात आले आहेत, जे त्यांचे काम अजून सोपं करतील. गुगलने नेक्सस 5 आणि नेक्सस 7 (टॅबलेट) साठी अॅंड्रॉइड 5.0 अपडेटची घोषणा केली आहे. या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये बॅटरी सेव्हिंग फीचरदेखील आहे.
पुढच्या स्लाइड्सवर जाणून घ्या नवीन अँड्रॉइड 5.0 L ची वैशिष्टये