GOOGLE आपला बहुप्रतिक्षित आपला अँड्रॉइड कार प्रोजेक्ट 'अँड्रॉइड ऑटो' जगासमोर आणला आहे. कंपनीचे वार्षिक डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये कारशी संबंधित या प्रोजेक्टच्या पुढच्या फेजबद्दल माहिती दिली. 'अँड्रॉइड ऑटो' हे आपल्या फोनमधील एक अॅप्लिकेशन आहे. ज्यामुळे बाकीचे अॅप्लिकेशन्स कारच्या डॅशबोर्डवरच्या टच स्क्रीनला जोडले जातात. यानंतर तुम्ही तुमच्या आवाजाने फोनला आज्ञा करू शकता, त्यासाठी तुम्हाला कारच्या स्टेअरिंगवरून हात काढण्याची गरज नाही.
डिसेंबर 2014 पर्यंत येतील अशा कार..
'अँड्रॉइड ऑटो'ने अद्ययावत असलेल्या कार डिसेंबर 2014 पर्यंत येतील, अशी माहिती GOOGLE ने दिली. अॅपल या कंपनीने यापूर्वी 'कार प्ले'च्या रूपाने टेक्नॉलॉजी सादर केली आहे. अँड्रॉइड मोबाइल युजर्सची संख्या जगात झपाट्याने वाढत आहे.
मोठमोठ्या कार कंपन्यांशी करार...
'अँड्रॉइड ऑटो'साठी 28 कार कंपन्या आणि टेक कंपनी 'एनव्हीडीया'ने मिळून 'ओपन ऑटोमोटीव्ह अलायन्स' उभारले केले आहे. याचा मुख्य उद्देश कारला 'अँड्रॉइड डिव्हाइस'ला जोडणे आहे. यामुळे कारचालकाला कार चालवत असतानाही त्याच्या फोनमधील सगळे अॅप्स तो कारमध्ये वापरू शकतो.
GOOGLE ने करार केलेल्या कंपन्यांमध्ये बेंटले, फरारी, ऑडी, फोर्ड, निसान, माझदा, सुझुकी, स्कोडा आणि
होंडा या प्रमुख कंपन्यांचादेखील समावेश आहे.
काय काय करेल 'अँड्रॉइड ऑटो'
यामुळे तुमची म्युझिक प्लेलिस्ट कारला जोडली जाऊ शकते. विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीचे गाणे व्हॉइस कमांडच्या माध्यमातून निवडू शकता. तसेच ट्रॅफिकचे हालहवालही जाणून घेऊ शकतात.
गुगल मॅप्सच्या आधारे दिशा ओळखता येतील. कंपनी रेडिओशिवाय म्युझिक स्ट्रीम करणारे काही सॉफ्टवेअर्सदेखील 'अँड्रॉइड ऑटो'मध्ये जोडण्यात येणार आहेत.
(फाइल फोटो- अँड्रॉइड ऑटो असलेला डॅशबोर्ड)
पुढच्या स्लाइडवरील व्हिडिओत पाहा; 'अँड्रॉइड ऑटो' कसे काम करतो...