गॅझेट डेस्क - स्मार्टफोनची खरी ओळख म्हणजे त्यांचे मल्टीफिचर्स असणे. मात्र या फिचर्सचा जास्त वापर करायचा म्हटलं तर बॅटरी बॅकअप चांगला हवा. नाही तर वारंवार फोन हातात कमी आणि चार्जिंगलाच जास्त लावलेला दिसतो. ही बाब अनेकांच्या डोकेदुखीचे कारण बनली आहे. विचार करा, जर तुम्ही अत्यंत महत्त्वाचे काम करत असाल आणि त्या दरम्यान तुमच्या मोबाईलची बॅटरी संपली तर तुम्हाला केवढे टेन्शन येईल. त्यामुळे अशा डोकेदुखीपासून सुटका करण्यासाठी तुम्ही या स्मार्टफोन्सचा विचार करू शकता.
अत्याधुनिक फिचर्सयुक्त अनेक नवीन स्मार्टफोन चांगला बॅटरी बॅकअप देऊ शकतात. यामध्ये जास्त फिचर्स म्हणजे जास्त बॅटरी लागणे. त्यामुळे अॅन्ड्रॉईड किकटॅक अशा अत्याधुनिक ऑफरेटींग सिस्टीमसोबतच एकदम चांगला बॅटरी बॅकअप देणार्या स्मार्टफोनबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
divyamarathi.com खास तुमच्यासाठी घेऊन आलाय काही असे स्मार्टफोन ज्यांच्यात अॅन्ड्रॉईड किटकॅट 4.4.2 ऑपरेटिंग सिस्टम तर आहेच. त्याचबरोबर चांगला बॅटरी बॅकअप लेटेस्ट फिचर्स, उच्च क्षमतेचा कॅमेरायुक्त असे पाच स्मार्टफोन. जे ठरतील तुमची स्मार्ट चॉईस...
चला तर मग पाहूयात पुढील स्लाईडवर हे स्मार्टफोन्स कोणकोणते आहेत ते...