(गूगलच्या हेडक्वाटरमधील अँड्रॉइडचे पुतळे)
गॅजेट डेस्क - गुगलच्या अँड्रॉईड L (Lollipop) अपडेट 3 नोव्हेंबरला नेक्सस 7 आणि नेक्सस 10 डिव्हाईसमध्ये डाऊनलोडसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नेक्सस 6 आणि नेक्सस 9 हे असे पहिले दोन डिव्हाइस आहेत जे अँड्रॉइड 5.0 L वर काम करतात. याशिवाय आजपासून नेक्सस 7 आणि नेक्सस 10 मध्येही याचे अपडेट डाऊनलोड करता येऊ शकतात. त्याचबरोबर इतर काही
स्मार्टफोन्सवरूनहे आजपासून अँड्रॉइड L अपडेट करता येऊ शकते. मात्र यामध्ये थोडा वेळ लागू शकतो. सर्वात पहिले नेक्सस सिरीजमध्ये याचे अपडेट येईल, हे अपडेट इतर कंपन्यांच्या स्मार्टफोनमध्ये कधीपासून करता येईल याबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र नेक्सस सिरीजनंतर HTC च्या स्मार्टफोनमध्ये हे अपडेट केल्या जाऊ शकते.
अँड्रॉईड ऑपरेटींग सिस्टीम ही जगातील सर्वात जास्त वापरल्या जाणारी ऑपरेटींग सिस्टीम आहे. या ओएसचे फीचर्स जेवढे आकर्षक आहेत, तितकेच आकर्षक याची नावे आहेत. अँड्रॉइडचा हिंदीमध्ये असा अर्थ आहे की - माणसाप्रमाणेच दिसणारे आणि काम करणारे यंत्र (रोबोट). या ऑपरेटींग सिस्टीमची नावे प्रत्येकवेळेस मिठाईंच्या नावावरूनच ठेवली जातात. Divya Marathi.com तुम्हाला आज सांगणार आहे, अँड्रॉईडबद्दल काही खास गोष्टी.. ज्या तुम्हाला आतापर्यंत माहित नव्हत्या.
1. अँड्रॉईड ओएसची नावे मिठाईंच्या नावावर का असतात -
अँड्रॉईड ओएसची नावे मिठाईंच्या नावावर का असतात या बद्दल अजून गुगल कसलाच खुलासा केलेला नाही. मात्र गुगलचे प्रवक्ता रॅन्डाल सराफा (Randall Sarafa) यांनी सांगितले की ही नावे टीमला जोडून ठेवण्याकरिता ठेवण्यात आली आहे. सराफा यांच्यानुसार मिठाईंच्या नावावरच अँड्रॉईडचे नाव ठेवण्यात आले आहे आणि ठेवले जाईल. असे का केले जाते हे कोणालाच समजाऊन सांगता येणार नाही, मात्र यामुळे गुगलच्या टीमला रिप्रेझेंट केल्या जाऊ शकते.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, कोणी बनवले होते अँड्रॉईड आणि इतर माहिती...