Home | Business | Gadget | android phones in india

हे अँन्ड्रॉइड!

दिनार जाधव | Update - Jun 15, 2011, 11:12 AM IST

फोन विकत घेताना त्याच्या विविध फिचर्सकडे लोक बारकाईने बघतात. किती मेगा पिक्सलचा कॅमेरा, ब्लू-टूथ, मेमरी अशा ठरावीक गोष्टी बघून आपण तो मोबाइल विकत घेतो.

 • android phones in india

  फोन विकत घेताना त्याच्या विविध फिचर्सकडे लोक बारकाईने बघतात. किती मेगा पिक्सलचा कॅमेरा, ब्लू-टूथ, मेमरी अशा ठरावीक गोष्टी बघून आपण तो मोबाइल विकत घेतो. ठरावीक लोकच त्या मोबाइलच्या अजून टेक्निकल गोष्टी पडताळून पाहतात. मोबाइलची ‘ऑपरेटिंग सिस्टिम’ याची नीट माहिती करून तो मोबाइल विकत घेण्यात जास्त शहाणपण असते. सध्या या ऑपरेटिंग सिस्टिम्समध्ये सर्वात गाजत असणारे ओ. एस. म्हणजे अँन्ड्रॉइड. 2003 पासून अस्तित्वात असलेल्या ‘अँन्ड्रॉइड’ या कंपनीला 2005 मध्ये ‘गुगल’ या नामवंत कंपनीने घेतले. मागील वर्षापर्यंत ‘अँन्ड्रॉइड’ फारशी कमाल दाखवू शकली नाही; पण त्याच्या काही लेटेस्ट व्हर्जन्सनी चांगले मार्केट मिळवून देण्यास मदत केली. या सर्वच फोन्सनी ‘स्मार्ट फोन्स’ या क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आहे. या ‘अँन्ड्रॉइड’चे नेमके फिचर्स काय? यावर नजर टाकू.
  - लेआऊटस् : सोप्या शब्दांत सांगायचे तर, याचे 2 डी आणि 3 डी ग्राफिक्स उत्तम असून, पारंपरिक फोन्सशी मिळतेजुळते असल्याने वापरण्यास सोपे असतात.
  - कनेक्टिव्हिटी : अँन्ड्रॉइड GSM/EDGE, CDMA, UMTS, ब्लू टूथ, Wi-Fi आणि Wi-Max यांना सपोर्ट करतो.
  - अँन्ड्रॉइडवर विविध भाषा वापरण्याची सुविधा आहे.
  - अँन्ड्रॉइडचा मुख्य पाया ‘JAVA’ असल्याने ते विविध प्लॅटफॉर्म्सवर सहजतेने वापरता येते.
  - विविध प्रकारच्या मीडिया फाईल्स या ‘अँन्ड्रॉइड’ ओ. एस. असलेल्या फोन्सवर चालतात.
  - अँन्ड्रॉइड गुगलचे सर्वच अँप्लिकेशन्स वापरू शकते.
  अशा अनेक फिचर्समुळे ‘अँन्ड्रॉइड’ सर्वांची फेव्हरेट ओ. एस. बनली आहे. मायक्रोसॉफ्ट किंवा मॅकसारख्या ओ. एस. यांच्या सॉफ्टवेअर्स आणि मीडिया यांच्यावर असलेली, किंवा त्यांच्यामुळे येणारी बंधने ‘अँन्ड्रॉइड’ युझर्सवर नाहीत. त्यामुळे आजकाल जास्तीत जास्त फोन्स याच ओ. एस. सोबत भारतीय बाजारपेठेत उतरले आहेत. शिवाय यांच्या किमतीही ‘बजेट’मध्ये बसणार्‍या आहेत. त्यामुळे अनेकांचा, विशेषत: तरुणांचा कल या फोन्सकडे आहे.
  ‘अँन्ड्रॉइड’वर चालणारे काही स्मार्ट फोन्स
  -सॅमसंग गॅलक्सी 3, 5
  - सोनी इरिक्सन 10 मिनी प्रो
  - एल. जी. ऑप्टिमम 1
  - एच. टी. सी. डिझायर
  - डेल XCD 28
  वरीलपैकी बहुतेक फोन 10,000 ते 15,000 रु.च्या दरम्यान बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर फोन घेण्याच्या विचारात असाल, तर ‘अँन्ड्राइड’ ओ. एस. असलेल्या फोनचा विचार जरूर करा.
  dinarj19@gmail.com

Trending