Home | Business | Gadget | android very useful for operating system

यामुळे आहे अँड्रॉइड सर्वोत्तम

प्रतिनिधी | Update - Jun 29, 2012, 12:52 PM IST

अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम वापरण्यास सोपी आहे. तिचे डेव्हलपर्स जगभर पसरलेले आहेत, जे तिच्यासाठी अ‍ॅप्स (अ‍ॅप्लिकेशन्स) तयार करतात.

 • android very useful for operating system

  अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम वापरण्यास सोपी आहे. तिचे डेव्हलपर्स जगभर पसरलेले आहेत, जे तिच्यासाठी अ‍ॅप्स (अ‍ॅप्लिकेशन्स) तयार करतात. मात्र, अ‍ॅपल ऑपरेटिंग सिस्टिमचे डेव्हलपर्स कमी आहेत. त्यामुळे तिचे अ‍ॅप्स डेव्हलप करणे सोपे नाही. याशिवाय अ‍ॅपलमध्ये नसलेले अ‍ॅप्स अँड्रॉइडमध्ये उपलब्ध आहेत.
  नेव्हिगेशन आहे सोपे
  अँड्रॉइडमध्ये नेव्हिगेशन सिस्टिम सोपी आहे. त्यामुळे मेल ब्राउझ करणे, मेसेज पाठवणे, कॉल करणे, व्हिडिओ पाहणे, इतरांना मेसेज फॉरवर्ड करणे आणि फाइल अ‍ॅटॅच करणे सोपे जाते. अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये या सर्व गोष्टी एका क्लिकसरशी होतात.
  गुगल सर्व्हिस सपोर्ट
  अँड्रॉइड सिस्टिम गुगलच्या साह्याने डेव्हलप करण्यात आली आहे. त्यामुळेच गुगल सर्च व जी-मेल वापरणारे लोक अँड्रॉइडला अधिक पसंती देतात. अँड्रॉइडवर थेट सर्च करण्याची सुविधा असताना आधी गुगल ब्राउझ आणि नंतर सर्चसाठी टेक्स्ट टाइप करण्याएवढा वेळ कुणीच दवडू इच्छिणार नाही.
  उत्तम सोशल नेटवर्किंग
  आज देशाच्या प्रत्येक भागातील लोक फेसबुक आणि ट्विटरवर आहेत. नवे मित्र जोडण्यासाठी ते सोशल नेटवर्किंग साइट्सचा उपयोग करतात. हेच लक्षात ठेवून अँड्रॉइड उपकरण अतिशय प्रगत अ‍ॅप्लिकेशनसह बाजारात सादर करण्यात आले आहे. त्याच्या साह्याने तुम्ही सहजतेने सोशल साइट्सवर जाऊ शकता. तज्ज्ञांच्या मते, अँड्रॉइडच्या माध्यमातून तुम्ही फेसबुक व ट्विटरसारख्या सोशल साइट्सवर आयओएसपेक्षा लवकर जाऊ शकता.
  स्मार्टफोनसाठी मोफत
  अँड्रॉइडचे कोणतेही सॉफ्टवेअर तुम्ही मोफत वापरू शकता. मात्र, आयओएस मोफत उपलब्ध नाही. तथापि, अ‍ॅपलचे बरेच अ‍ॅप्लिकेशन्स वेगळे व महागडेही आहेत. याउलट बहुतेक अँड्रॉइड अ‍ॅप तुम्ही मोफत वापरू शकता. तसेच अँड्रॉइड उपकरण कमी किमतीत उपलब्ध होते, तर आयओएस खूप महाग आहे. अँड्रॉइड फोन तुम्हाला 100 डॉलर्सला (जवळपास 5600 रुपये) मिळेल, तर आयओएससाठी तुम्हाला कमीत कमी 400 डॉलर्स (जवळपास 22,400 रुपये) मोजावे लागतील. किमतीतील एवढ्या तफावतीमुळेच अँड्रॉइडला बाजारावर वर्चस्व मिळवणे सोपे गेले.
  उत्तम कनेक्टिव्हिटी
  अँड्रॉइड उपकरणात आयओएसपेक्षा इंटरनेट कनेक्टिव्हिटीची सुविधा चांगली आहे. त्याबरोबरच अँड्रॉइड उपकरणात नेटवर्कही सोपे असते. त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी लोक अँड्रॉइड उपकरणाचा जास्त वापर करतात. जाणकारांच्या मते अँड्रॉइड हेच स्मार्टफोनचे भविष्य आहे.

Trending