आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगोलाची संसद सौरऊर्जेने उजळली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आफ्रिकेतील अंगोला देशाची संसद आणि विमानतळ सौरऊर्जेने उजळले आहे. या प्रमुख वास्तूंना सौरऊर्जेचा साज चढविण्यात सुकॉम या भारतीय कंपनीचा मोठा वाटा आहे. एवढेच नव्हे तर अंगोलातील अनेक वास्तू सौरऊर्जेने उजळून निघाल्या आहेत.


मलावी येथील 450 शाळा, गऊनचे एसईझेड येथेही सुकॉमच्या मदतीने सौरऊर्जेचा वापर होत आहे. कंपनीचे एमडी व सीईओ कुँवर सचदेव यांनी सांगितले, आफ्रिकेत ज्या पद्धतीने कंपनीचा कारभार वाढतो आहे, ते पाहता कंपनीच्या नायजेरिया येथील क्षेत्रीय कार्यालयाचा विस्तार करण्यात येत आहे. सध्या सुकॉमची उलाढाल 1050 कोटी रुपये आहे. यातील 70 कोटी रुपयांची उलाढाल केवळ आफ्रिकेतील देशांची आहे. चालू आर्थिक वर्षात ही उलाढाल वाढून 100 ते 150 कोटींपर्यंत पोहोचवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. बांगलादेश तसेच नेपाळसारख्या शेजारी देशात सुकॉम सौरऊर्जा क्षेत्रात अव्वल क्रमांकावर आहे.