आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX - पाहा, अनिल अंबानींचे Laxury Cars क्रेझ; रॉल्सरॉईस ते विमान आणि जहाजाची आहे ताफ्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः रेंज रोवर लग्जरी कार - अशाच प्रकारचे एक मॉडेल अनिल अंबानी यांच्याजवळ आहे. ही कार अनिल अंबानींची आवडीची कार आहे.)

‘स्टार्स ऑन व्हील’ नावाच्या आमच्या या सिरीजमधअये आम्ही तुम्हाला नेहमी देशभरातील नामवंत, सेलिब्रिटीज आणि श्रीमंत व्यक्तींच्या कार्सबद्दल सांगत असतो. त्यामध्ये आज divyamarathi.com तुम्हाला सांगणार आहे सुप्रसिध्द उद्योजक ज्यूनिअर अंबानी म्हणजेच अनिल अंबानींच्या लक्झरी कार कलेक्शनबद्दल. मात्र अनिल यांच्याजवळ केवळ लक्झरी कार्सच नसून एक हेलीकॉप्टर, विमान आणि एक जहाजसुध्दा आहे. यासोबतच आम्ही तुम्हाला अनिल अंबानी यांच्या लाईफस्टाईलबद्दलही सांगणार आहोत.

धीरूभाई अंबानी यांचे लहाने सुपुत्र आणि धीरूभाई अंबानी ग्रूपचे सर्वोसर्वा अनिल अंबानी यांचे नाव देशातील तसेच जगभरातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत नोंदवले गेले आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार अनिल यांच्याकडे 45,017 कोटी रुपयांची संपत्ती आहे. अनिल यांचे मोठे भाऊ मुकेश अंबानी यांच्या उलट अनिल यांना प्रसिध्दीत राहणे आवडते. लक्झरी लाईफस्टाईलचे शौकीन ज्यूनिअर अंबानी यांच्याकडे खासगी विमान, खासगी जहाज, हेलिकॉप्टर पासून अनेक महागड्या लक्झरी कार्सचे कलेक्शन आहे.
अनिल यांनी हिंदी चित्रपटातील सुप्रसिध्द अभिनेत्री आणि स्वतःपेक्षा दोन वर्षांनी मोठी असलेल्या टीना मुनीम हीच्याशी लग्न केले. अनिल-टीनाला दोन मुले आहेत. यामधील मोठ्यामुलाचे नाव अनमोल अंबानी आणि दुसर्‍या मुलाचे मनाव जय अंसुल अंबानी असे आले.
अनिल अंबानी यांचे ड्रीम होम - काही दिवसांपूर्वी अनिल आपल्या घरामुळे चर्चेत आले होते. मुंबईच्या पाली हिल येथे अनिल अंबानी हे आपले ड्रीम होम बनवत आहे. ऑक्टोबर 2013 मध्ये त्यांनी या ड्रीम होम प्रोजेक्टचे काम सुरू केले होते. सध्या अनिल त्यांची आई कोकिलाबेन अंबानी यांच्यासोबत त्यांच्या दक्षिण मुंबई येथील 14 मजली घरात राहात आहेत.
कार कलेक्शन - Jr. अंबानी जवळ जगातील सर्वात महागड्या कार्सचे कलेक्शन आहे. यामध्ये रेंज रोव्हर, रॉल्स रॉईस, पोर्शे, लेक्सस एसयुव्ही, ऑडी Q7, मर्सिडीज GLK350, मर्सडीज एस क्लास, Lamborghini Gallardo आणि Maybach यांचा समावेश आहे.
प्रायव्हेट जेट कलेक्शन- अनिल अंबानी यांच्याजवळ 4 प्राइवेट जेट आहेत यामध्ये बेल 412, बोम्बार्डियर ग्लोबल एक्सप्रेस, फॅलकॉन 2000 आणि फैलकॉन 7X यांचा समावेश आहे.

प्राइव्हेट याट्स-
लक्झरीलाईफ जगण्याचे शौकीन अनिल यांनी त्याच्या पत्नी टीना हिच्या वाढदिवसा दिवशी तीला एका याट (छोटी जहाज) भेट दिली होती. याचे नाव त्यांनी TiAn असे ठेवले आहे. हे नाव टीना आणि अनिल यांच्या नावाच्या सुरूवातीच्या दोन अक्षरांवरून ठेवण्यात आले आहे. इटलीमध्ये बनवण्यात आलेल्या या याटला अनिल यांनी 400 कोटी रुपयांना विकत घेतले होते.

या सुध्दा आहेत लक्झरी आवडी - अनिल आणि त्यांची पत्नी टीना अंबानी यांना आर्ट आणि पेंटींगचीही विशेष आवड आहे. त्यांच्या घरी एम. एफ. हुसेन यांच्या समवेत जगभरातील अनेक नावाजलेल्या चित्रकारांची चित्रे आहेत. तसेच, मॅक्सिकन, थाय, आणि इटालियन खाद्यपदार्थही खुप आवडतात. त्यासाठी त्यांचे आवडते ठिकाण हॉटेल 'द ओबेरॉय' हे आहे. याशिवाय त्यांचे जगभरात प्रसिध्द असलेल्या फॅशन लाईन टॉम फोर्डचे सुट घालणे आवडते.
पुढील स्लाईडमध्ये पाहा... Junior अंबानींचे लक्झरी कार, विमान, हेलिकॉप्टर आणि जहाजाचे कलेक्शन