आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS: एक ओळ लिहून, हिने मिळवली जगभर प्रसिद्धी अन् कमवले कोट्यवधी रूपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
=>अनुजा चौहान : 1970, मेरठ, उत्तर प्रदेश
जाहिरात क्षेत्रातील अव्वल व्यक्तींमध्ये स्थान प्राप्त केलेल्या अनुजा यांनी वयाच्या 24 व्या वर्षी जेडब्ल्यूटी इंडियामध्ये नोकरी पत्करली आणि पहिल्याच वर्षी त्यांना पेप्सीची सर्वात मोठी जाहिरात मिळाली. या पार्श्वभूमीवर अनुजा चौहान म्हणाल्या, ज्या कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरी स्वीकारली त्याच कंपनीत 17 वर्षांपासून कार्यरत आहे ही बाब सुखावह आहे. नऊ वर्षांत नऊ पदोन्नती मिळाल्या. सर्वात तरुण उपाध्यक्ष झाले. लहानपणापासून लिखाणाची आवड होती. सर्जनशील लिखाणाची आवड होती, त्यामुळे कायम लिहीत राहिले. लिखाणाच्या सवयीला व्यावसायिक रूप देण्याचा विचार केला आणि 2008 मध्ये पहिल्यांदा "द झोया फॅक्टर' ही कादंबरी लिहिली. त्याला प्रतिसाद चांगला मिळाला. यानंतर 2010 मध्ये लिखाणासाठी नोकरी सोडली. या वर्षी बॅटल फॉर बिट्टोरा आणि 2012 मध्ये दोज प्रायसी ठाकूर गर्ल्स यासारख्या बेस्टसेलर्स पुस्तकांचे लिखाण झाले. दोज प्रायसी ठाकूर गर्ल्सचे पुढचे भाग हाऊज दॅट बिझी बिल्ट पूर्ण केले असून ते याच महिन्यात बाजारात येणार आहे. त्या स्टार प्लसच्या एका कार्यक्रमासाठी लिहीत आहेत.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, अनुजा चौहान यांचे शिक्षण आणि त्या कशाप्रकारे राहिल्या चर्चेत...