आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Apax Partners Buys GlobalLogic, Wal Mart And Bharti Enterprises Separeted

\'वॉलमार्ट\'ने तोडले \'भारती\'शी नाते; आता दोघांचे मार्ग वेगवेगळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉलमार्ट स्टोअर्सने भारतीय भागीदार असलेल्या भारती इंटरप्रायझेसशी काडीमोड केली आहे. आता या दोन्ही कंपन्यांचे मार्ग वेगवेगळे असून ते भारतात स्वतंत्र व्यवहार करणार असल्याचे आज (बुधवारी) संयुक्त प्रसिद्धी प‍त्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे. यासोबत दोन्ही कंपन्यांचे रिटेल व्यवहारातील संबंधही संपुष्ठात आल्याचे समजते.

दुसरीकडे, खासगी क्षेत्रातील अग्रेसर असलेली कंपनी 'अ‍ॅपेक्स पार्टनर'ने नुकतेच आयटी आऊटसोर्सिंग फर्म 'ग्लोबललॉजिक' ला 420 मिलियन डॉलरमध्ये (2578 कोटी रुपये) खरेदी केले आहे. आयआयटीच्या चार ‍विद्यार्थ्यांनी ग्लोबललॉजिकची स्थापना केली होती. अ‍ॅपेक्सचा आतापर्यंतचा भारतातील सगळ्यात मोठा सौदा आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी या कंपनीने पाटनी कॉम्प्यूटरला 1.2 अब्ज डॉलरमध्ये आयगेय कॉर्पला खरेदी करण्यात सहकार्य केले होते.