आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पासपोर्ट, व्हिसा, हज सेवेसाठी परराष्ट्र मंत्रालयाचे स्मार्टफोन अ‍ॅप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारताचे परराष्ट्र मंत्रालय आता मोबाईल अ‍ॅपच्या जगात प्रवेश करीत आहे. पासपोर्ट, व्हिसा, हज सेवा आणि काऊंसलर सेवेसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून सर्व नागरिकांसाठी लवकरच स्मार्टफोन अ‍ॅप सादर केले जाणार आहे.

संकेतस्थळाच्या माध्यमातून परराष्ट्र मंत्रालय पुरवित असलेल्या सर्व सेवा स्मार्टफोन अ‍ॅपमध्ये सहज उपलब्ध राहणार आहेत. स्मार्टफोन किंवा टॅबलेटवर असलेल्या एका टॅबमध्ये नागरिकांना या सेवा मिळणार आहेत. प्रसार माध्यमे, विद्यार्थी, विचारवंत, राजदूत, प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांना एका खिडकीच्या माध्यमातून सेवा देण्यासाठी विशेष अ‍ॅपची संकल्पना राबविली जाणार आहे. परराष्ट्र मंत्रालयासंदर्भात किंवा इतर सेवांसदर्भात कुणालाही कोणतीही माहिती हवी असल्यास या अ‍ॅपचा उपयोग होणार आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे फेसबुक आणि ट्विटर प्रकल्प यशस्वीरीत्या पार पडले आहेत. यावरील अकाऊंटच्या मदतीने नागरिकांपर्यंत आपल्या सेवा पोहोचविण्यात परराष्ट्र मंत्रालय यशस्वी झाले आहे. आता अ‍ॅपच्या माध्यमातून सेवा पुरविल्या जाणार आहेत.