आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Apple Cuts Mac Book Pro Price By Rs. 11,000 Know More About The Offer

\'अ‍ॅपल\'चा लॅपटॉप झाला स्वस्त; \'अ‍ॅपल\'ने कमी केल्या 11,000 रु.ने लॅपटॉपच्या किंमती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(13-inch non-Retina MacBook Pro)
गॅजेट डेस्क - तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी 'अ‍ॅपल'ने त्यांचा महागडा लॅपटॉप मॅकबुकच्या किंमती कमी केल्या आहेत. मात्र ज्या मॉडेल्सच्या किंमती केल्या आहेत त्याच्या हार्डवेअरमध्ये 'अ‍ॅपल'ने काही बदल केले आहेत.

भारतात विकणार्‍या रॅटीना मॅकबुकच्या प्रो प्रकारातील लॅपटॉपच्या किंमतीत कंपनीने कपात केली आहे. रॅटीना मॅकबुकच्या जवळपास सर्वच लॅपटॉपच्या किंमती कंपनीने 5000 रुपयांनी कमी केल्या आहेत. तर नॉन रेटीना मॅकबुक प्रोच्या किंमतीत 11000 रुपयांनी घट करण्यात आली आहे. टेक्नॉलॉजीमध्ये प्रथम क्रमांकावरील या कंपनीच्या 13 इंचाच्या नॉन रॅटीना मॅकबुकची किंमत आता 78900 रुपये एवढी केली आहे. या लॅपटॉपची किंमत जरी कमी केली असली तरी कंपनीने या लॅपटॉपचे प्रोसेसर आणि रॅमच्या क्षमतेत वाढ केली आहे.
हार्डवेअरमध्ये बदल करण्यासोबतच किंमत कमी करण्याची 'अ‍ॅपल'ची ही एक नवीन रणनिती असू शकते. भारतीय बाजारपेठेत आपल्या गॅजेटसोबत 'अ‍ॅपल' नेहमीच विविध ऑफर देतो. आयफोन 4 पासून ते आयफोन 5S पर्यंतच्या सर्वच स्मार्टफोन्स, आयपॅड, मॅकबुक यांच्यावर कंपनीने विविध सुटही दिली होती.
पुढील स्लाईडमध्ये पाहा नॉन रॅटीना 13 इंच मॅकबुकबद्दल...