आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅपलच्या तपासणीत आहे गर्भित इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकन सरकार व मोठ्या टेक कंपन्यांत प्रेम आणि द्वेषाचे नाते असते. अ‍ॅपलचे सीईओ सिनेटसमोर बाजू मांडत होते. त्यावेळी सिनेटर आपल्या आवडत्या आय गॅझेटचे कौतुक करतानाच अ‍ॅपलवर 2485 अब्ज रुपयांच्या उत्पादनावरील कर चुकवण्याचा आरोप करत होते. तपास समितीचे अध्यक्ष कार्ल लेविन म्हणाले, अ‍ॅपलने आपल्या उत्पन्नाचा मोठा वाटा विदेशातील आपल्या कंपन्यांमध्ये वळवून कर वाचवण्याचा मार्ग अवलंबला आहे. त्यावर कुक म्हणाले की, अ‍ॅपलने गेल्या वर्षी कॉर्पोरेट कराच्या रूपात 339 अब्ज रुपये भरले आहेत. अमेरिकन संस्थांनी सुमारे 1120 अब्ज रुपये विदेशात ठेवले आहेत. 35 टक्के कॉर्पोरेट कर वाचवण्यासाठी त्यातील मोठा वाटा देशात आणू इच्छित नाहीत. अ‍ॅपलने मोठी रक्कम ठेवलेल्या आयर्लंडमध्ये 12.5 टक्के कर आहे. कंपन्यांनी ही रक्कम मायदेशी आणावी व त्याचा वापर रोजगार निर्मितीसाठी करावा, अशी सरकारची इच्छा आहे. अ‍ॅपल कंपनीच्या हिशेबाची तपासणी सुरू करून सरकारने इतर बहुराष्ट्रीय कंपन्यांना स्पष्ट इशारा दिला आहे.


एकट्या अमेरिकेतच कर सुधारणा होत आहेत असे नाही. कर्जाच्या ओझ्याखाली असलेले श्रीमंत देश कॉर्पोरेट करांच्या चोरीवर करडी नजर ठेवून आहेत. यंदाची जी-8 देशांची बैठक ब्रिटनच्या अध्यक्षतेखाली होत आहे. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी दावोसमध्ये सांगितले होते की, कर चुकवणाºया बहुराष्ट्रीय कंपन्यांनी जागे व्हावे आणि कॉफीचा वास घ्यावा. त्यांचा संकेत स्टार बक्सकडे होता. कर वाचवण्याची चौकशी सुरू झाल्यानंतर ब्रिटनमध्ये जास्त कर देण्याची तयारी कंपनीने दाखवली आहे.


घटता कंपनी कर
1952 : अमेरिका सरकारला करांच्या स्वरूपात मिळणारा उत्पन्नाचा वाटा सुमारे एक तृतीयांश होता. आज तो 10 टक्क्यांच्या थोडा कमी राहिला आहे.
कंपनी कर
1952 - 32 %
2012 - 8.9 %