अ‍ॅपलच्या सात इंची / अ‍ॅपलच्या सात इंची 'आयपॅड मिनी'बाबत ग्राहकांमध्ये उत्सुकता

Apr 18,2012 12:10:19 PM IST

अ‍ॅपल कंपनीचा 'आयपॅड मिनी' लवकरच बाजारात दाखल होणार असल्याची चर्चा आहे. त्याच्या नावाप्रमाणे हा टॅब्लेट सात इंच लांबीचा आहे. तसेच या आयपॅडची किंमत 250 डॉलर अर्थात 12500 रुपये आहे. त्यामुळे मिनी आयपॅडबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. डिसेंबर 2012 पर्यंत हा टॅब्लेट बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
माहिती तंत्रज्ञानाच्या जगात विविध संकेतस्थळां या टॅब्लेटबाबत नवनवीन माहिती उपलब्ध करून देताहेत. अमेरिकेत तर 'आयपॅड म‍िनी'चे गूगलवरही ट्रेंडींग केले जात आहे.
अ‍ॅपलचे दिवंगत संस्थापक स्टीव जॉब्स यांना 'आयपॅड मिनी'ची कल्पना मान्य नव्हती. त्यांच्या मते आयपॅड किमान 10 इंच लांबीचा असावा. छोट्या आयपॅडबाबत डेव्हलपर्संला अनेक अडचणी येतात. वेगवेगळ्या स्क्रीन साईजसाठी त्यांना अ‍ॅप्लिकेशन्स तयार कराव्या लागत असतात.

X