आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

APPLE ने 22,900 रुपयांत लॉन्च केला iPhone 4

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय बाजारपेठेत मार्केट शेअर वाढवण्यासाठी आता APPLE ने एक नवीन पाउल उचलले आहे. एकीकडे iPhone5च्या किमतीमुळे त्याची अपेक्षीत विक्री होत नाही तर दुसरीकडे IBNLIVE आणि BGR नुसार APPLEचा iPhone 4, 22900 रुपयांत भारतात दाखल झाला आहे.
मार्केटींगमुळे नेहमीच चर्चेत असणा-या APPLE कंपनीने गेल्या वर्षीच 5S आणि 5C लॉन्च करताना, कंपनीने iPhone 4 चे प्रोडक्शन बंद करणार असल्याचे जाहीर केले हाते. या सोबतच iPhone 4 चे बेसिक मॉडेलमध्ये रूपातंर करणार असल्याचेही सांगितले होते. APPLE iPhone 4ची किंमत 15000 रुपये असण्याची काही दिवसांपूर्वीच बातमी होती. आता अखेर 22,900 रुपयांत लॉन्च केला आहे.
मागच्या वर्षी आयफोन 4S साठी Apple ने बायबॅक स्किम आणली होती. ज्यामुळे आयफोन 4S च्या विक्रित 400 टक्क्यांची वाढ झाली आहे. जूने मॉडेल असूनही आयफोन 4S च्या विक्रीने नवीन उच्चांक प्रस्तापीत केले असल्याचा उल्लेख कंपनीने तिमाही अहवालात केला आहे.
पुढील स्लाइडवर वाचा Appleच्या बायबॅक स्किमविषयी आणि iPhone 4चे फिचर्स...