Home »Business »Gadget» Apple-Iphone-5-Leaked-Feature

अ‍ॅपल आयफोन 5: फोटो आणि फीचर झाले लीक, नेक्‍स्‍ट जनरेशन थ्रीडी सहित अनेक सुविधा

दिव्‍यमराठी वेब टीम | May 15, 2012, 13:35 PM IST

  • अ‍ॅपल आयफोन 5: फोटो आणि फीचर झाले लीक, नेक्‍स्‍ट जनरेशन थ्रीडी सहित अनेक सुविधा

जगभरातील मोबाईलप्रेमी अ‍ॅपल आयफोन 5 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्‍या सप्‍टेंबर महिन्‍यात बाजारात हा फोन येण्‍याचा अंदाज वर्तवण्‍यात येत आहे. जून महिन्‍यात वर्ल्‍डवाईड डेव्‍हलपर परिषदेत अ‍ॅपल याबाबतीत खुलासा करण्‍याची शक्‍यता आहे.
उल्‍लेखनीय म्‍हणजे बाजारात सादर होण्‍यापूर्वीच आयफोन 5 चे फीचर आणि फोटो लीक झाले आहेत. लिक्विडमेटल टेक्‍नॉलॉजीचा हा स्‍मार्टफोन अनेक मेटलच्‍या मदतीने बनवण्‍यात येणार आहे.
अ‍ॅपल आयफोन 5 साठी वेगवेगळे भाग बनवणारी कंपनी एसडब्‍ल्‍यू बॉक्‍सने याचे काही खास वैशिष्‍टये शेअर केली आहेत. सादर आहेत अ‍ॅपल आयफोन 5चे काही प्रमूख वैशिष्‍टये-
थ्रीडी ऑब्‍जेक्‍ट रिकग्‍नायझेशन
आयफोन 5 मध्‍ये अ‍ॅपलने थ्रीडी फेस आणि ऑब्‍जेक्‍ट रिकग्‍नायझेशन तंत्राचा वापर केला आहे. 10 मे रोजी कंपनीने याच्‍या पेटंटसाठी अमेरिकेकडे अर्ज केला होता. या तंत्रामुळे आयफोनमध्‍ये तीन वेगवेगळया पद्धतीने फोटो पाहता येतील. त्‍याचबरोबर यामध्‍ये चेहरा ओळखून मोबाईल लॉक उघडण्‍याची सुविधा देण्‍याचीही योजना आहे.
थ्रीडी फोटोग्राफी
थ्रीडी कॅमेरा आणि व्हिडिओ रेकॉर्डरची सुविधा आयफोन 5मध्‍ये देण्‍यात आली आहे. यामध्‍ये सेन्‍सरच्‍या मदतीने थ्रीडी फोटो कॅप्‍चर करता येईल. यामधील एक सेन्‍सर पोलारायझिंग इमेज घेईल, तर उरलेले दोन सेन्‍सर नॉन पोलारायझिंग इमेज कॅप्‍चर करतील.
अ‍ॅपलअवतार
अ‍ॅपल वापरणा-यांना आयट्यून स्‍टोरमधून चित्रपट, अ‍ॅप्‍स आणि इतर साहित्‍य खरेदी करण्‍यासाठी अ‍ॅपल आयडीची गरज पडते. परंतु, आयफोन 5 मध्‍ये याची आवश्‍यकता भासणार नाही. या नव्‍या फोनमध्‍ये अ‍ॅपल अवतार नावाने एक नवे फिचर दिले जाईल. कंपनीकडून याच्‍या पेटंटसाठी अर्ज देण्‍यात आला आहे. तर दुसरीकडे युजर्सला आपल्‍या आवश्‍यकतेनुसार ही सेवा कस्‍टमाईज करता येईल. त्‍यानंतर यामध्‍ये नवीन सेवा स्‍वत:हून सेव्‍ह होतील.
अ‍ॅडव्‍हान्‍स हेपटिक्‍स
आयफोन 5मध्‍ये एक नवी हेपटिक्‍स फीडबॅक सिस्‍टम पुरवण्‍यात आला आहे. यामध्‍ये थ्रीडी बटनच्‍या मदतीने टच फक्‍त बोलून आपल्‍याला मोबाईल वापरता येईल. या फिचरचा वापर आयटीव्‍ही, आयपॅड आणि आयफोन सारख्‍या एक्‍सटर्नल डिस्‍प्‍लेमध्‍येही करता येऊ शकतो.
सॅमसंग सादर करतोय भारतातील अशा प्रकारचा पहिलाच मोबाईल
नोकियाने लॉन्‍च केला सर्वात स्‍वस्‍त मोबाईल
या मोबाईल कंपनीचे ग्राहक अडचणीत, सेवा होणार बंद
फक्‍त 1094 रूपयात 'ड्युल' सिम, कॅमेरा आणि ब्‍लूटूथ मोबाईलNext Article

Recommended