आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Apple Iphone 6 Photos Leak On Net, Front Panel Of Next Generation Iphone Surfaces

नेक्स्ट जनरेशन स्मार्टफोन IPHONE-6 चे फोटोज् लीक; सोशल मीडियात झाली व्हायरल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोस्ट अवेटेड नेक्स्ट जनरेशन स्मार्टफोन 'आयफोन-6'चे फोटोज् इंटरनेटवर लीक झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर एक बिग स्क्रीन असलेल्या आयफोन-6 ची फोटोज् व्हायरल बनली आहेत. फोटोज् पाहून नेटिजन्स 'आयफोन-6'च्या डिझाइनबाबत तर्कविर्तक मांडताना दिसत आहेत.
'आयफोन-6'ची फोटोज पाहिली असता या स्मार्टफोनचे डिझाइन 'आयपॅड एअर'सारखीच आहे. अन्य मॉडल्सच्या तुलनेत हा फोन अत्यंत स्लिम असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या अॅपल कंपनी 'आयफोन-6' च्या दोन मॉडेल्सवर काम करत आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात हा फोन बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये डिस्प्लेचा फरक आहे. एक 4.7 इंचाचा तर दुसरा 5.7 इंचाचा आहे. याचा अर्थ असा की, अॅपल स्मार्टफोनसह 5.7 इंचाचा फॅबलेट पहिल्यांदा बाजारात उतरवत आहे. 'आयफोन-6' हा सॅमसंगच्या गॅलेक्सी सिरिजला टक्कर देवू शकतो.
पुढे वाचा, 'आयफोन-6'ची वैशिष्ट्ये...