Apple ने बिग स्क्रीन ipad लॉन्च करण्याची तयारी केली आहे. यापूर्वी Apple ने बिग स्क्रीन iphone लॉन्च केला होता.
टेक साइट Re/code च्या अहवालानुसार, कॅलिफोर्नियामध्ये येत्या 16 ऑक्टोबरला Apple चा मेगा इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. या इव्हेंटमध्ये बिग स्क्रीन ipad लॉन्च होण्याची शक्यता आहे. यासोबत 'मॅकिंटोश सॉफ्टवेअर' देखील सादर केले जाऊ शकते. मात्र,याबाबत Apple ने मौन बाळगले आहे.
दरम्यान, येत्या 15 ऑक्टोबरपासून चीनमध्ये iphone-6 ची विक्री सुरु होणार आहे. भारतीय बाजारात iphone-6 आणि 6 प्लस कधी लॉन्च होतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नोव्हेंबरमध्ये Apple भारतीय बाजारात मोठा धमाका करण्याची शक्यता आहे.