Home | Business | Gadget | apple-to-launch-new-iphone-next-month

ऍपलचा नवा आयफोन बाजारात येणार

वृत्तसंस्था | Update - Jul 07, 2011, 12:27 PM IST

तंत्रज्ञानात अव्वल असणारी अमेरिकेतील सर्वोच्च कंपनी ऍपल पुढील महिन्यात बाजारात धमाका करणार आहे.

  • apple-to-launch-new-iphone-next-month

    नवी दिल्ली - तंत्रज्ञानात अव्वल असणारी अमेरिकेतील सर्वोच्च कंपनी ऍपल पुढील महिन्यात बाजारात धमाका करणार आहे. ऍपल एक नवा आयफोन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. ऍपलने या नव्या आयफोनमधील विविध पार्ट तैवानमधील कंपनीकडे फोन असेंबल करण्यासाठी दिले आहेत.

    तैवानमधील होन हाई इन ही कंपनी आयफोन असेंबल करीत आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, हा आयफोन हलका आणि आकारानेही लहान असणार आहे. यामध्ये ८ मेगापिक्सल कॅमेरा आणि आयफोन टचस्क्रिन असणार आहे. तसेच जर्मनीत बनविण्यात आलेल्या चीप यामध्ये असणार आहेत. ऍपलच्या आयफोनमधील अनेक पार्ट परदेशात तयार होत असल्याने या नव्या आयफोनसाठीही वेगवेगळ्या देशांमधून पार्ट मागविण्यात येणार आहेत. ऍपलने यावर्षी २५ लाख आयफोन विकण्याची तयारी सुरु केली आहे.

Trending