Home »Business »Gadget» Apple TV Launched In India

अवघ्या आठ हजार रुपयात भारतात लॉन्च झाला APPLE TV

भास्कर न्यूज नेटवर्क | Feb 20, 2013, 18:47 PM IST

  • अवघ्या आठ हजार रुपयात भारतात लॉन्च झाला APPLE TV

'अ‍ॅपल'ने आपला APPLE TV भारतीय बाजारात नुकताच लॉन्च केला आहे. या टीव्हीच्या बेसिक मॉडेलची किंमत 8295 रुपये इतकी आहे. ग्राहकांना आपला आधीचा टीव्ही सेट बाजूला ठेऊन देण्याची गरज नाही. कारण अ‍ॅपल टीव्हीला आय-ट्यून्स अकाउंटला वायरलेस मीडिया कंटेन्ट स्ट्रीम केल्यानंतर टीव्ही सुरु होईल.

याचबरोबर 'अ‍ॅपल'ने भारतात नुकतेच आय-ट्यून्स स्टोअर्स उघडले आहे. त्यात हाय-डेफिनिशन मूव्हीज् अवघ्या 490 रुपयांत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अ‍ॅपल टीव्हीला मायक्रोमॅक्स स्मार्ट स्टिक आणि अकाई स्मार्ट बॉक्सला कम्पीट करावे लागेल.

Next Article

Recommended