आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅपलचे नवे वॉच वियरेबल टेकमध्ये नवे पर्व सुरू करेल?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अ‍ॅपल पूर्णपणे नव्या संशोधनांच्या व्यवसायात नाही. ते पुनरुज्जीवनाच्या व्यवसायात आहे. डिजिटल म्युझिक प्लेअर, टॅब्लेट संगणक यांसारख्या उत्पादनांना त्यांनी थडग्यातून बाहेर काढले आहे. पूर्वी मागणी नसलेल्या वस्तूसाठी अ‍ॅपल मागणी निर्माण करते. इतर कोणत्याही कंपनीपेक्षा अ‍ॅपल हे काम चांगल्या पद्धतीने करते. या वेळी अ‍ॅपलने पहिल्यांदा स्मार्ट वॉच बाहेर काढले आहे. अ‍ॅपल वॉच केवळ नवे उत्पादनच नाही, तर आपल्या शरीरावर प्रभुत्व गाजवणारे तंत्रज्ञान आहे.

मनगटी घड्याळांना पहिल्यांदा १९२० मध्ये लोकप्रियता मिळाली होती. १९७० मधील कॅल्क्युलेटर वॉच आिण त्यानंतर आलेले पेजर वॉच, फोन वॉच यांसारखी घड्याळे यशस्वी होऊ शकली नाहीत. २००४ मध्ये आलेले मायक्रोसॉफ्ट स्पॉट वॉच काही वर्षांतच संपुष्टात आले. फक्त २५ डॉलर किमतीच्या कॅल्क्युलेटर वॉचने अस्तित्व टिकवून ठेवले आहे. परंतु तंत्रज्ञान कंपन्यांनी मनगट संगणकाने सजवण्याची कल्पना सोडलेली नाहीये. गेल्या काही वर्षांच्या काळात अ‍ॅपलच्या प्रत्येक स्पर्धकाने स्मार्ट वॉच काढले आहे. सॅमसंग, सोनी, एलजी आणि मोटारोला स्मार्ट वॉच विकतात. सॅमसंगने गॅलेक्सी गियर लाइनची दहा लाखांहून जास्त घड्याळे बनवली आहेत. जूनमध्ये गुगलने अँड्रॉइड वियर सादर केले आहे. २०१२ मध्ये आलेले स्मार्ट वॉच पीबलचे चार लाख युनिट विकण्यात आलेले आहेत.

स्मार्ट वॉचसारख्या तंत्रज्ञानाची आणखी एक कॅटेगरी वियरेबल्सला मार खावा लागला. यात फिटबिट, जाबोनचा अप, नाइकेचा फ्युअलबँड असे फिटनेस ट्रेकर्सचा समावेश आहे. वियरेबल्स कॅटेगरीला विश्लेषक निद्रिस्त राक्षस मानतात. तो कोणत्याही क्षणी जागा होऊ शकतो. क्रेडिट सुइसे यांचा अंदाज आहे की, तीन ते पाच वर्षांच्या आत लोक वियरेबल्सवर वर्षाकाठी ३० ते ५० अब्ज डॉलर खर्च करतील. परंतु, २०१३ मध्ये फिटनेस वियरेबल्सचे मार्केट फक्त ३३ कोटी डॉलर होते.

वियरेबल्सला चांगले यश न मिळण्याचे प्रमुख कारण त्याची कुरूपता आहे. अ‍ॅपल वॉचसाठी ही समस्या नाही. इतर स्मार्ट वॉचच्या तुलनेत सुंदर, लहान आणि हलकी आहे. त्यात फीचर्सची रेलचेल आहे. त्यावर फोनसारखे कॉल केले जाऊ शकतात. टेक्स्ट मेसेज, ई-मेल केले जाऊ शकतात. तथापि, लहान स्क्रीनमुळे लिहिण्याच्या तुलनेत वाचणे सोपे आहे. युजर एकमेकांना लहान ड्रॉइंग, अ‍ॅनिमेशन पाठवू शकतात. ते काही सेकंदांनंतर नष्ट होऊन जाईल.

पाइपर जेफ्रेचा अंदाज आहे की, पहिल्या वर्षी वॉचचे एक कोटी युनिट विकले जाऊ शकतात. मोर्गन स्टेनलेला तीन ते सहा कोटींचा अंदाज आहे. काही असो, वॉच अ‍ॅपलच्या फोन मार्केट घसरण्यापासून वाचवेल. कारण अ‍ॅपल वॉच आयफोनशिवाय काम करणार नाही.-सोबत डेन कॅडमे, जॅक लिन्शी, व्हिक्टर लुकरसन, अॅलेक्झांड्रा सिफरलीन

बिझनेसचे गणित
अ‍ॅपल वॉच जोरदार हिट झाले तरी ते आयफोन बिझनेसच्या पातळीपर्यंत लवकर पोहोचणार नाही. अ‍ॅपलच्या एकूण विक्रीत फोनची भागीदारी सर्वाधिक आहे. त्यांनी गेल्या वर्षी १६ कोटी तीस लाख फोन विकले. आयफोनपासून १९७६ अब्ज रुपयांचे उत्पन्न मिळाले. पहिल्या वर्षी वॉचचे एक कोटी युनिट विक्री करू शकतो. मोर्गन स्टेनलेला ३ ते ६ कोटी युनिट विक्रीचा अंदाज आहे.