Home | Business | Gadget | apple win court case oppose samsung

कायदेशीर लढाईत अ‍ॅपलने केली सॅमसंगवर सरशी

वृत्तसंस्था | Update - Jul 04, 2012, 11:17 PM IST

अमेरिकेतील एका न्यायालयाने अ‍ॅपलच्या याचिकेवर सुनावणी करताना सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सला अमेरिकी बाजारात आपल्या गॅलक्झी टॅब्लेट 10.1 ची विक्री रोखण्याचे आदेश दिले आहेत.

 • apple win court case oppose samsung

  सॅन फ्रान्सिस्को - अमेरिकेतील एका न्यायालयाने अ‍ॅपलच्या याचिकेवर सुनावणी करताना सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सला अमेरिकी बाजारात आपल्या गॅलक्झी टॅब्लेट 10.1 ची विक्री रोखण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय अ‍ॅपलचा मोठा कायदेशीर विजय असल्याचे समजले जात आहे. याचिकेत म्हटले होते की, सॅमसंगचे उत्पादन सरळसरळ अमेरिकेच्या पेटंट नियमांचे उल्लंघन करत आहे.
  अ‍ॅपल आणि सॅमसंग या दोन्ही कंपन्यांत टॅब्लेट आणि स्मार्टफोन बाजारातील वर्चस्वासाठी कट्टर स्पर्धा सुरू आहे. सॅमसंगचा अँड्रॉइड आॅपरेटिंग सिस्टिमवर चालणारा गॅलक्झी टॅब 10.1 हा अ‍ॅपलच्या आयपॅडसाठी सर्वात मोठे आव्हान असल्याचे मत गॅजेट विश्लेषकांत आहे. कॅलिफोर्नियाच्या सॅन जोसमधील जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश ल्यूसी कोह यांनी आपल्या निर्णयात सांगितले की, निर्विवादपणे सॅमसंगला स्पर्धा करण्याचा पूर्ण हक्क आहे. मात्र, नियमांविरुद्ध या प्रकारची उत्पादने आणून कायद्याचे उल्लंघन करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही.
  फेडरल कोर्टाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
  सिलिकॉन व्हॅलीस्थित सांता कार्ला शहरातील कायद्याचे प्राध्यापक कोलीन चेन यांनी फेडरल कोर्टाचा निर्णय अभूतपूर्व असल्याचे म्हटले आहे. या आधारावर या प्रकारचे निर्णय देता येत नाहीत, अशीही पुस्ती त्यांनी जोडली आहे. हे डिझाइन पेटंटचे प्रकरण आहे. या प्रकरणात बहुतांश प्रकरणे एखाद्या उत्पादनाच्या नकलेशी संबंधित असतात. प्रतिस्पर्धा हा त्यांचा आधार नसतो. पुढे स्मार्टफोनबाबतच्या सर्व खटल्यांचा निकाल हेच कोर्ट घेईल, असे त्यांना वाटत नाही. अ‍ॅपलने 2010 पासून जगभरात पेटंट युद्ध भडकावून ठेवले आहे. याचा मुख्य उद्देश हा गुगलच्या अँड्रॉइड बेस्ड उपकरणांची लोकप्रियता कमी करणे हा आहे.

  असे आहे प्रकरण
  गॅलेक्झी 10.1 च्या निर्मितीत सॅमसंगने आपल्या 13 तंत्रज्ञानाचा वापर केल्याचा आरोप अ‍ॅपलने केला आहे. सॅमसंगने या आरोपांचा केव्हापासूनच इन्कार केला आहे. इतकेच नव्हे तर ही प्रकरणे फक्त अ‍ॅपलच्या म्हणण्यामुळे दाखल करून घेण्यात आली असल्याचा पलटवार सॅमसंगने केला आहे. गंमत म्हणजे अ‍ॅपलच्या आपल्या अनेक उत्पादनांत सॅमसंगच्या पेटंटेड तंत्रज्ञानाचा उपयोग केल्याचे उघड झाले आहे.
  तीव्र प्रतिस्पर्धा
  अ‍ॅपलने प्रतिस्पर्ध्यांवर दाखल केले आहेत 350 पेक्षा अधिक खटले.
  अनेक प्रकरणे हे अ‍ॅपल, पॉड आणि सफारीसारख्या शब्दांच्या वापराबद्दल आहेत दाखल.
  फळ विक्रेत्यांसह न्यूयॉर्क शहराविरुद्धही कंपनीने लावले आहेत अ‍ॅपल शब्दाच्या गैरवापराचे आरोप.

Trending