आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अधिक गृहकर्ज हवे असल्यास करा संयुक्त अर्ज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्जाशिवाय घर खरेदी बहुतांश लोकांसाठी केवळ अशक्यप्राय बाब आहे. काही लोकांना गृहकर्ज घ्यायचे असते. मात्र त्यांची कर्ज मिळण्यासाठीची पात्रता (रक्कम) फारच कमी असते. आता मात्र यामुळे घाबरून जाण्याचे बिलकूल कारण नाही. तुम्हाला तुमची गृहकर्ज मर्यादा वाढवायची असेल तर आपण संयुक्तपणे गृहकर्ज घेऊ शकतो. आपला-आपली जीवनसाथी नोकरी करत असेल अथवा त्यांच्याकडे उत्पन्नाचा नियमित स्रोत असेल तर आपण त्यांच्याबरोबर कर्ज घेऊ शकता.
संयुक्त गृहकर्ज अजून अधिक सुलभपणे प्राप्त होऊ शकते. आपण नातेवाइकांसह कर्ज घेणार असाल, म्हणजेच त्यांचाही खरेदी होणा-या प्रॉपर्टीत (संपत्ती) वाटा असेल तर ते अधिक सोयीचे होणार आहे. संयुक्त गृहकर्ज घेण्याचे इतर काही फायदेही मिळतात याचबरोबर कर्जाचा बोजा दोन्ही भागीदारांत वाटला जातो. विशेषज्ञ सांगतात की, आजच्या वाढत्या घरांच्या किमती पाहता आणि करबचतीचे नियोजन लक्षात ठेवून जॉइंट होमलोन संयुक्त गृहकर्ज घेण्याची संस्कृती वाढू लागली आहे.
पंजाब नॅशनल बँकेचे महाव्यवस्थापक एस. पी. सिंह यांनी सागितले की, संयुक्त कर्ज घेणे यात दोघांच्या उत्पन्नांचे पुरावे जोडून कर्ज पात्रता वाढते व तशी ती गणली जाते. त्यामुळे आपण आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त कर्ज घेऊ शकता. थोडक्यात सांगायचे तर कर्जमर्यादा वा पात्रता वाढवण्यासाठी संयुक्त गृहकर्ज हा एक अत्यंत सुंदर विकल्प आहे. ही गोष्ट वेगळी आहे की, असे कर्ज केवळ पती-पत्नी, भाऊ-भाऊ, भाऊ-बहीण आणि पिता-पुत्र हे घेऊ शकतात.
सुविधा : संयुक्त गृहकर्ज घेताना बँकेला केवायईसीत सोपेपण येते
फायदा : वय जास्त असल्याने गृहकर्जाची पात्रता कमी होते वा घटते. संयुक्त गृहकर्जात मात्र ही पात्रता वाढते.
सवलत : आयकरचे कलम 80 सी उपनियम 24 च्या अंतर्गत होमलोन घेणा-याला आयकरातून सूट मिळते.