आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2005 पूर्वीच्या नोटांना निरोप देताना...बँकांमार्फतच व्यवहार होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिझर्व्ह बॅँकेने 22 जानेवारी 2014 रोजी 2005 पूर्वीच्या नोटा लोकांनी बॅँकेमार्फत रिझर्व्ह बॅँकेला 30 जून 2014 पर्यंत परत कराव्यात असा आदेश काढला आहे. त्यासाठी बॅँकेने सर्व बॅँकांना आदेश दिले, शिवाय लोकांच्या माहितीसाठी वृत्त निवेदने 23 व 24 जानेवारीला दिली आहेत. बॅँकेने नोटा रद्द केलेल्या नाहीत व 31 मार्च 2014 पर्यंत सर्व व्यवहारात कायदेशीर चलनपैसा आहे, पण 1 एप्रिल 2014 पासून पुढे मात्र सन 2005 पूर्वीच्या नोटा व्यवहारात कायदेशीर चलन असणार नाहीत व त्या नोटा बॅँकांकडून बदलून देण्यात येतील. याबाबत सर्वसामान्य माणसांचे बरेच गैरसमज झाले आहेत. किरकोळ आर्थिक व्यवहारात बरीच धाकधूक व गोंधळ वाढला आहे. काही दुकानदार तर आत्ताच सन 2005 पूर्वीच्या नोटा नाकारायला लागले आहेत व त्यातून ब-याच अडचणीही समोर येऊ लागल्या आहेत.


विवादात न पडता आपल्या हितरक्षणासाठी आवश्यक आहे हे समजून घ्या
आपण या चलनबदल व सुधारणांविषयी काही बाबी मानल्या पाहिजेत व समजून घेतल्या पाहिजेत जुन्या नोटा चलनातून काढण्याचा कार्यक्रम बरोबर की चूक या आर्थिक चर्चा विवादात, या कार्यक्रमाचा उपयोग होईल की नाही व ऐन निवडणुकीच्या वेळी हा कार्यक्रम राजकीय हेतूने प्रेरित आहे की काय हे तिन्ही मुद्दे असतील तर असू द्या. हा कार्यक्रम यशस्वी करणे आपल्या हितरक्षणासाठी आवश्यक झाले आहे. रिझर्व्ह बॅँकेने चलनातील संचित असणारा काळा पैसा, व्यवहारात आणण्यासाठी, बनावट नकली नोटांना प्रभावहीन करण्यासाठी व पुढील काळात असली नोटांच्या नकला करणे अशक्य करण्यासाठी हा चलनसुधार कार्यक्रम सुरू केला आहे. तो पुरेसा उपयुक्त असणे, होणे हे पुढील काळात ठरेल पण आपल्याला हा कार्यक्रम व्यापक आर्थिक हितरक्षणासाठी व वैयक्तिकदृष्ट्या आपल्या पैशाचे मूल्य मिळविण्यासाठी आपल्याला सन 2005 पूर्वीच्या नोटा शक्य तितक्या लवकर बदलून घेणे आवश्यक आहे. या नोटा बदलण्याच्या कार्यक्रमातील खालील महत्त्वाच्या तारखांची नोंद व आठवण आपण ठेवली पाहिजे. तीन तारखा लक्षात ठेवल्या तर आपण सामान्य माणसांनी घाबरायचे, गडबडून जायचे काही कारण नाही. आपल्याजवळ नंबर दोन, काळापैसा, बेहिशेबी पैसा असे काही नसते व जे कष्टार्जित कमाईचे संचित आहे, त्यात, कुठलाही तोटा येण्याचे वा नुकसान होण्याचा तिळमात्र संभव नाही. पण तरीही पूर्व परंपरेने किंवा स्वभावत:च आपल्यापैकी अनेकजण आपली बचत चलनीनोटांत घरी, कपाटात, कुलूपात वा लॉकर्समध्ये ठेवतात. सा-या ठेवलेल्या नोटा आपण लगेच बदलून घ्याव्यात. यात हलगर्जीपणा केला तर भविष्यात अशा संचित नोटा म्हणजे रंगीबेरंगी नक्षीदार कागद होऊन जातील.
आपल्या कमाईतील नोटांमधील जवळ बाळगलेली बचत पूर्णपणे किंमत राखून मिळवायची असेल तर खालील गोष्टी लगेच कराव्यात
1. 5 ते 25 हजारांपर्यंतच्या नोटा ठेवतो. त्यातील सन 2005 पूर्वीच्या नोटा बाजूला काढाव्यात या सन 2005 पासूनच्या नोटेच्या मागील बाजूस, खालच्या बाजूस, मधोमध नोट छापल्याचे साल असते. ते साल ज्या नोटेवर नाही त्या सा-या सन 2005 पूर्वीच्या आहेत, त्या, वेगळ्या कराव्यात.
2. या सन 2005 पूर्वीच्या नोटा बॅँकेत नेऊन बदलून घ्याव्यात अशा त्या आताही बदलून मिळतील.
3. सन 2005 पूर्वीच्या नोटा बदलून घेण्याऐवजी आपल्या बॅँक खात्यात भराव्यात. त्यात अडचण कमी येते, वेळ कमी लागतो.
4. बॅँकेत खाते नसेल तर ते उघडावे व त्यात हातावरील नोटांमधील सर्व शिल्लक भरावी.
5. आपल्या व्यवहारांत आपल्याला सन 2005 पूर्वीच्या नोटा आल्या तर त्याही आपल्या बॅँक खात्यात भराव्यात. शिल्लक ठेवू नयेत व दुर्लक्षित ठेवू नये.
6. 1 एप्रिल 2014 नंतर सन 2005 पूर्वीच्या नोटा आपण लोकांकडून घ्यायच्या नाहीत याची काळजी घ्यावी लागेल पण समजा चुकून आल्या किंवा कुणा गरिबाच्या घ्याव्याशा वाटल्या तर काळजी करायचे कारण नाही त्या आपल्या बॅँकेकडून बदलून मिळतील किंवा आपल्या खात्यात भरता येतील.
7. 1 जुलै 2014 नंतर मात्र 500 आणि 1000 च्या नोटा मोठ्या संख्येने आपल्या आर्थिक व्यवहारात घेणे टाळावे व घेतल्या तर बॅँकेच्या खात्यात भराव्यात, ज्याच्याकडून घेतल्या त्याची नोंद आपल्याकडे असू द्यावी.
मुख्य म्हणजे जास्तीत जास्त पेमेंट्स बॅँकेमार्फत करावीत व अगदी किरकोळ पैसे देण्याचे व्यवहार रोखीने करावेत. एकप्रकारे सन 2005 पासून रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियाने हा कार्यक्रम करून चलनसुधारणा करायचे ठरविले होते असे म्हणता येईल. यातून पुढच्या चांगल्या नव्या नोटा बाजारात येतील व नकलेतून नकलींचा उपद्व्याप आवरला जाईल. अर्थात यासाठी आपल्याला व बॅँकांना मोठे व्यवस्थित करावे लागणार आहे, पण ते आपल्याच हिताचे असल्याने आवश्यक आहे.


नोटा बदलण्याच्या कार्यक्रमातील खालील महत्त्वाच्या तारखा
31 मार्च 2014 पासून मात्र सन 2005 पूर्वीच्या 500, 1000, 100, 50 आणि 10 या सा-या नोटा आर्थिक व्यवहारात चालणार नाहीत. त्या फक्त बॅँकेतच भरता येतील व बॅँकेतूनच बदलून मिळतील. 1 जुलै 2014 पासून पुढे 500 आणि 1000 रुपये मूल्याच्या दहा किंवा त्याहून संख्येने जास्त नोटा बदलून घेण्यासाठी ज्या बॅँकेत खाते आहे तिथे त्या मिळतील. बॅँकेत खाते नसेल किंवा त्या बॅँकेत खाते नसेल तर नोटा बदलून घेण्यासाठी आपली व्यक्ती ओळख व निवास पत्त्याची निश्चिती सादर करावी लागेल.