आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article Of Devendra Pandit About Person To Person Lending

पर्सन टू पर्सन लेंडिंग : एक अभिनव संकल्पना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'वेब पोर्टल कंपन्यांची समन्वयाची भूमिका महत्त्वाची : आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही तीन प्रकारे पैसा उभा करू शकतात :- एकतर भीक मागा, उधार मागा किंवा चोरी करा. पहिला प्रकार लाजिरवाणा आहे तर तिसरा प्रकार हा मूर्खपणाचा आहे. म्हणून सहसा सर्वजण मधल्या विकल्पाचा वापर करतात.
तारण न ठेवता घेतलेल्या वैयक्तिक कर्जावर (पर्सनल लोन) जास्तीचे व्याजदर लागते, जरी कर्ज घेणार्‍या व्यक्तीला चांगली नोकरी, उत्तम पगार, चांगले पतमानांकन असले तरी त्याला बँकेला 1८ ते 20 % व्याज (पर्सनल लोनवर) द्यावे लागते. आजघडीला भारतात जवळपास 60 % लोक बँकिंग प्रणालीपासून वंचित असून, त्यातील 25 % लोक कर्ज घेण्यास अपात्र आहेत. अशा परिस्थितीत अपात्र असा व्यक्ती जेव्हा सावकाराकडून कर्ज घेते तेव्हा त्यास ७5 % ते 300 % वार्षिक व्याज भरावे लागते व तो कधी न सुटणार्‍या जाळ्यात अटकत जातो.
लॅण्ड ऑफ अपॉर्च्युनिटी, असे संबोधल्या जाणार्‍या भारतात खरच काही दुसरा असा मार्ग उपलब्ध नाही आहे का? पी टु पी - पर्सन टू पर्सन; लेंडिंग वेब पोर्टल्स / साइट्स असा मार्ग उपलब्ध करून देत आहेत.

पी 2 पी - पर्सन टू पर्सन लेंडिंग म्हणजे काय ? : आपत्कालीन तुम्हाला जर 50,000 रुपये कर्ज / उसने पाहिजे असतील तर बँक तुम्हाला पर्सनल लोनवर 18 ते 24% वार्षिक व्याजदर लावेल. परंतु त्याच वेळेस एखाद्या व्यक्तीला 50,000 रुपये सुरक्षितपणे पण बँकेपेक्षा जास्त व्याज मिळवून देणारी गुंतवणूक करायची असेल तर? किती उत्तम होईल जर तुम्ही त्या व्यक्तीला भेटून 12% व्याज दर देऊ केला. कारण बँक ठेवींवर त्या व्यक्तीला फक्त 9-10 % व्याज मिळेल. तो व्यक्ती तुमचे उत्पन्न, नौकरी / धंदा ह्या गोष्टी बघून तुम्हाला कर्ज देण्यास तयारसुद्धा होईल. आजपर्यंत असा व्यक्ती शोधून काढणे अवघड होते, आणि हीच गोष्ट हेरून भारतातील काही पहिल्या पिढीतील उद्योजकांनी पी 2 पी - पर्सन टू पर्सन लेंडिंग ही संकल्पना वेब पोर्टल्सद्वारे भारतात चालू केली आहे. ज्यात पी2पी वेब पोर्टल कंपन्या संभाव्य कर्ज घेणारे आणि देणारे यांना एकत्र आणून त्यांना मान्य असलेल्या व्याजदरावर व्यवहार घडवून आणतात. ज्यात तिन्ही व्यक्ती - कर्ज घेणारा, कर्ज देणारा आणि दोघांना एकत्र आणणारा, फायद्यात राहतात. कर्ज देणार्‍या व्यक्तीला बँकेच्या व्याजदरापेक्षा जास्त व्याज मिळते. कर्ज घेणार्‍या व्यक्तीला बँकेपेक्षा कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध होते, आणि पी2पी वेब पोर्टल कंपनी व्यवहार घडवून आणल्याबद्दल दोन्ही पार्र्टीकडून शुल्क(फीस) चार्ज करते.

पी 2 पी - पर्सन टू पर्सन लेंडिंग पोर्टल्सचे काही संभावित तोटे :
1. कर्जाची रक्कम कर्जदाराकडून वेळोवेळी जमा करणे, न दिल्यास येथे बंकिंगसारखे तारणसुद्धा उपलब्ध नसते, जेणेकरून बुडीत खात्यांची संख्या वाढू शकते.
2. मोठ्या बँका पी2पी कंपन्यांना गिळंकृत करू शकतात.
3. पी2पी कंपन्यांवर नजर ठेवणार्‍या अशा नियामक संस्थेचा अभाव, कारण पी2पी कंपन्या ना आर.बी.आयच्या किवां सेबीच्या नियंत्रण क्षेत्रात येतात.
ह्या सर्व गोष्टी भगत पी2पी - पर्सन टू पर्सन लेंडिंग पोर्टल्सला चांगले भवितव्य असून, काही शासकीय उपाययोजना आणि निर्बंध लादले गेले पाहिजे. जेणेकरून ही संकल्पना सुरक्षित आणि सुकर होऊन सर्व प्रवर्गांपर्यंत पोहोचेल.

18 ते 24 टक्के एवढ्या व्याजातून मुक्ती
पी 2 पी - पर्सन टू पर्सन लेंडिंग पोर्टल्स का लोकप्रिय होत आहे
1.) लहान व्यवहार : - बँक किंवा मोठ्या फायनान्शिअल कंपन्या साधारणपणे मोठ्या व्यवहारांवर लक्ष केंद्रित करतात. जरी वैयक्तिक कर्जसुविधा उपलब्ध असली तरी गृह कर्ज किंवा बिझनेस कर्जापेक्षा अधिक नियम व अटी असतात. परंतु पी 2 पी - पर्सन टू पर्सन लेंडिंग पोर्टल्समध्ये कर्ज देणारी व्यक्ती त्याला इच्छुक असलेली रक्कम 3 - 4 कर्ज लागणार्‍या लोकांमध्ये विभागून देऊ शकतो, जर कोणी एकजण बुडीत निघालाच तर, संपूर्ण रक्कम बुडत नाही. तसेच पी 2 पी पोर्टल कंपन्या कर्ज घेणार्‍या व्यक्तींची पैसे परत करण्याची कुवत, कागदपत्र तपासतात.

2.) छोटी व नजीकची गुंतवणूक : - पारंपरिक गुंतवणूक योजनांमध्ये लांबलचक अशा अटी व नियम असतात, तसेच त्यांची मुदतसुद्धा अधिक असते. म्युच्युअल फंडामध्ये कालमर्यादा कमी असली तरी ठराविक परतावा नसतो. पी2पी लेंडिंग पोर्टल्सवर कालमर्यादा मिनिमम रक्कम मर्यादा नसते, पी2पी पोर्टल्सवर छोटेखानी कर्ज घेण्यास आकर्षित करतात.

3.) व्याज दर : - बँक जी तुम्हाला मोल तोल करून देऊन तुमच्या ठेवींवर किंवा कर्जावर व्याजदर ठरवेल. परंतु पी 2 पी पोर्टल्सवर कोणी मध्यस्त नसल्या कारणाने येथे आकर्षित व्याजदर उपलब्ध असतात.

4.) पारदर्शकता : - बँकिंग व्यवस्थेमध्ये कायदेशीर बाबी पूर्ण असल्यावरच कर्ज उपलब्ध होते, पण पी2पी - पर्सन टू पर्सन लेंडिंग पोर्टल्सवर कर्ज घेणार्‍या व्यक्तींची पडताळणी करूनच अशा व्यक्तीच गुंतवणूकदारांना परिचित केल्या जातात. पी 2 पी कंपन्या आजघडीला त्यांचे जाळे विस्तारत असून, कर्जाची रक्कम वसूल करणे हे केले जातेय.

5.) गुंतवणुकीचे विभाजन : - पी 2 पी - पर्सन टू पर्सन लेंडिंग पोर्टल्सद्वारे गुंतवणूकदार (कर्ज देणारा), 4 - 5 जणांमध्ये त्याची गुंतवणूक रक्कम विभाजित करून देण्याची मुभा असते.