आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article Of Gaurang Shah About Crude Oil And Iraq Situation

अल्प काळातील चढ-उतारांचा विचार नको

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इराकमधून निर्यात केल्या जाणार्‍या खनिज तेलाचे प्रमाण इतके प्रचंड नाहीये की जे अन्य ओपेक देशांना भरून काढता येणार नाही : सर्वप्रथम, इराकमधून निर्यात केल्या जाणार्‍या खनिज तेलाचे प्रमाण इतके प्रचंड नाहीये की जे अन्य ओपेक देशांना भरून काढता येणार नाही. दुसरे म्हणजे, बुधवारी सर्व जागतिक बाजार एक तर सकारात्मक राहण्यासाठी स्थिर होते किंवा किंचित नकारात्मक होते, पण यापेक्षा वेगळे काही घडले नाही (काही वेळासाठी माझ्या मनात आले की, इराकची राजधानी बगदाद भारतातच आहे) आणि अशा प्रकारे बाजारांनी प्रतिसाद दिला. माझ्या मते, नेहमीप्रमाणे जागतिक स्तरावर आलेल्या बातमीला रास्त प्रतिक्रियेपेक्षा अधिक प्रतिक्रिया देणे आपण थांबवले पाहिजे. या घटनांचे पडसाद उमटावेत, पण नेहमी उमटतात तसे नकोत. तिसरे म्हणजे, खनिज तेलाच्या किमती प्रतिपिंप 120 डॉलरच्या पुढे गेल्या आणि इराकमुळे निर्माण होणारा तुटवडा अन्य ओपेक देशांनी भरून काढला नाही तरच आपली भीती आणखी वाढू शकते.

गुंतवणूकदारांनी या करेक्शनकडे खरेदीची संधी म्हणून बघावे : आमच्या मते, बुधवारी दिसलेले करेक्शन ट्रेडरसाठी काळजीचे असू शकेल, पण गुंतवणूकदारांसाठी नाही. गुंतवणूकदारांनी या करेक्शनकडे खरेदीची संधी म्हणून बघावे. मूल्यांकनाच्या बाबतीत, काही क्षेत्रे व काही शेअर्स उत्पन्नाच्या तुलनेत महागडी वाटू शकतात. त्यांच्या बाबतीत सावध राहावे. बुधवारी मोठे करेक्शन झाल्यावर परकीय वित्तसंस्था आणि डीआयआय इक्विटी बाजारात निव्वळ खरेदी करत होत्या. यातून स्पष्ट होते की, दीर्घकालीन फंडामेंटल अजूनही शाबूत आहेत आणि अल्प काळातील चढ-उतारांचा फार विचार करू नये.
पंधरवड्यात रुपयाचे मूल्य कमकुवत झाल्यास ते 61 च्या टप्प्यात तर सक्षम झाल्यास 58 च्या दरम्यान असेल : मासिक रोखे खरेदी कमी करण्याचा यूएस फेडरलचा निकाल जागतिक बाजारांत आणि अन्यत्र चांगला ठरला. चलनाच्या बाबतीत, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची कामगिरी अत्यंत वाईट होती. रुपयाचे मूल्य 60. 50 पर्यंत पोहोचल्यावर ते बुधवारी काहीसे सावरले आणि 60.03 च्या आसपास होते. आमच्या मते, पुढील पंधरवड्यात रुपयाचे मूल्य कमकुवत झाल्यास ते 61 च्या टप्प्यात असेल आणि सक्षम झाल्यास 58.50 च्या दरम्यान असेल.

महागाई, वित्तीय तूट आटोक्यात आणण्यासाठी अर्थसंकल्पात कठोर पावलाची शक्यता : रेल्वे व केंद्रीय अर्थसंकल्पाचा परिणाम इक्विटीवर दिसेल. रेल्वेमध्ये विशिष्ट बाबतीत थेट परकीय गुंतवणुकीची घोषणा आर्थिक संकटात सापडलेल्या भारतीय रेल्वेसाठी अनुकूल ठरेल आणि रेल्वे अर्थसंकल्पात त्याची घोषणा झाल्यास त्याचा उपयोग होईल. महागाई आणि वित्तीय तूट आटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री काही कठोर पावले उचलण्याची शक्यता आहे, तसेच विविध क्षेत्रांत प्रतीक्षेच्या असलेल्या सुधारणांचीही घोषणा होऊ शकते.
इक्विटी बाजार खाली गेल्यावर खरेदी हवी
इक्विटी बाजाराबाबत सकारात्मक राहावे. चांगल्या उत्पन्नासाठी बाजार खाली गेल्यावर खरेदीधोरण अवलंबवावे. तेल, वायू, आयटी, फार्मा, खासगी बँका, ऑटो क्षेत्रांबाबत लार्ज निवडक मिड कॅपबाबतीत आम्ही सकारात्मक आहोत.
(लेखक हे जिओजित बीएनपी पॅरिबा फायनान्शिअल सर्व्हिसेस लि.चे सहायक आहेत)