आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तम फायद्यासाठी दीर्घकालीन सौद्याचे धोरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंट्रा डे ट्रेडिंग व विकली ट्रेड :
कमोडिटी ट्रेडिंग खात्यात ट्रेडिंग करताना अनेक प्रकारे विचार केला जातो. काही ट्रेडर इंट्रा डे ट्रेडिंग करतात, तर काही टेऑडर आठवड्यासाठी सौदे करतात व थोडासा फायदा मिळवून ते बाहेर पडतात किंवा स्टॉप लॉस फिगर ट्रिगर झाल्यामुळे त्यांना सौद्यातून बाहेर पडावे लागते; परंतु एक महिन्यापेक्षा जास्त व साधारणपणे 3 ते 4 महिन्यांपर्यंत असणार्‍या स्क्रिप्टमध्ये अत्यंत अभ्यासपूर्वक सौदे केल्यास हमखास फायदा होतो. अर्थात, यासाठी तिमाही, मासिक, आठवडा व प्रतिदिवस चार्टचा चांगला अभ्यास अत्यंत आवश्यक असतो. स्क्रिप्टचा कालावधी व आपल्याला मिळवायचा फायदा याचे योग्य संतुलन करून मार्जिन मनीचे योग्य व्यवस्थापन करून लॉट साइज ठरवावा लागतो.
स्क्रिप्टमधील गुंतवणुकीच्या सापेक्ष दुप्पट किंवा तिप्पटपेक्षा जास्त फायद्याची अपेक्षा न ठेवता सौद्यामधून बाहेर पडण्याचे धोरण ठेवल्यास हमखास फायदा : स्क्रिप्टमधील गुंतवणुकीच्या सापेक्ष दुप्पट किंवा तिप्पटपेक्षा जास्त फायद्याची अपेक्षा न ठेवता सौद्यामधून बाहेर पडण्याचे धोरण ठेवल्यास हमखास फायदा होतो. तसेच आपला ट्रेड खरेदीत किंवा विक्रीत आहे हे पाहून प्रत्येक दिवसाचा उच्चांक किंवा नीचांक पाहून तो दुसर्‍या दिवशी स्टॉपलॉस म्हणून लावावा. म्हणजे त्या दिवसापर्यंत मिळवलेला फायदा नुकसानीत रूपांतरित होत नाही व जर हा स्टॉपलॉस ट्रिगर झाला, तर परत एकदा नुकसान न होता ट्रेड घेता येतो व आपल्या दीर्घकालीन उद्देशाकडे वाटचाल चालू ठेवता येते. याबाबत आपले नफ्याचे धोरण ठरलेले असेल, तर कालावधी ही बाब दुय्यम ठरते. दीर्घकालीन ट्रेड घेताना कँडल स्टिक पॅटर्नमधील दोजी-मॉर्निंग स्टार- इव्हिनिंग स्टार- हँगिंग मॅन इत्यादी बाबींचा अत्यंत सखोलपणे अभ्यास करूनच हे ट्रेड घ्यावेत. याबाबत टेक्निकल अ‍ॅनालिसिसचे प्रशिक्षण अत्यंत आवश्यक ठरते.
लाँगटर्म पोझिशनल ट्रेड : लाँगटर्म पोझिशनल ट्रेड घेताना ज्या स्क्रिप्टमध्ये ट्रेड (सौदा) करणार आहोत. त्याचा लाइफटाइम उच्चांक व नीचांक तपासून ज्यांच्याजवळ असेल तेथून खरेदी किंवा विक्रीचा निर्णय घ्यावा. तसेच दीर्घकालीन सौदा करावयाचा असल्यामुळे जी स्क्रिप्ट 3 किंवा 4 महिने पुढील असेल त्यात सौदा करावा.
दीर्घकालीन सौद्याचे उदाहरण : आपण सध्या एक दीर्घकालीन सौद्याचे उदाहरण पाहू एप्रिल किंवा मेच्या स्क्रिप्टमध्ये. सोयाबीन खरेदी केल्यास सध्या रु. 3660 ते रु. 3750 दरम्यान खरेदी करावे व रु. 4100 ते रु. 4200 च्या दरम्यान सौद्यातून बाहेर पडावे. या स्क्रिप्टमध्ये 1 लॉट खरेदी करण्यासाठी सध्या रु. 28,000 पेक्षा कमी मार्जिन लागते व रु. 3 ते रु. 4 प्रतिकिलो फायदा झाल्यास रु. 30,000 ते रु. 40,000 एका लॉटला फायदा 3 ते 4 महिन्यांत होऊ शकतो. याचा स्टॉपलॉस रु. 3600 लावावा म्हणजे नुकसानही मर्यादित राहू शकते.
योग्य तांत्रिक विश्लेषण संयम व धोरण हवेच : अशा प्रकारे आपण अनेक दीर्घकालीन सौद्याबाबत विचार करू शकतो 1 वर्षात 5 ते 6 ट्रेड घेऊनदेखील आपण उत्तम नफा कमावू शकतो. फक्त योग्य तांत्रिक विश्लेषण संयम व धोरण निश्चितच आवश्यक ठरते.
comksaraf24@gmail.com