आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारसा: एअर एशियाचे पहिले विमान देशात आले, प्रवाशांसाठी त्याचे महत्त्व काय?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एअर एशियाचे पहिले 180 आसन क्षमतेचे बोइंग ए 320 हे विमान भारतात आले आहे. शनिवारी सकाळी नऊ वाजता ते चेन्नईच्या विमानतळावर उतरताच भारतीय प्रवाशांच्या स्वस्त विमान प्रवासाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
विमान प्रवास 20-25% स्वस्त होण्याची अपेक्षा
० ही विमानसेवा सुरू झाल्यामुळे देशातील बजेट एअरलाइन्सच्या भाड्यात 20-25 टक्के कपात होण्याची अपेक्षा आहे.
०ते रिकामी आसने भरण्यासाठी आकर्षक ऑफर देतात. अन्य कंपन्यांनाही तसे करणे भाग पडणार आहे.
०देशातील छोट्या शहरांपर्यंत विमानसेवेचा विस्तार
०विमान कंपन्यांमध्ये भाडे कमी करण्याची स्पर्धा सुरू होण्याची अपेक्षा.
०भारतामध्ये विमानतळ भाडे, इंधन दर खूपच जास्त आहेत, त्यामुळे एअर एशिया भाडे कमी करून अन्य ठिकाणचा खर्च कमी करून पैशाची बचत करेल. उदा.-
०प्रवाशांना ऑनलाइन सेवेचाच वापर करण्यास सांगितले जाईल.
०चेक-इनसाठी ऑनलाइन स्मरणपत्रे पाठवण्यात येतील.
०सेल्फ सर्व्हिस बोर्डिंग पासची यंत्रे बसवण्यात येतील.
०भोजन आणि लगेजची बुकिंगही ऑनलाइनच होईल.
०बुकिंग सर्व्हिस शुल्काच्या वरच्या व्यवहारासाठी कंपनी प्रक्रिया शुल्क आकारू शकते.
स्रोत : केपीएमजी कन्सल्टन्सी समूह
पुढील महिन्यापासून उड्डाण सुरू होण्याची आशा
० एप्रिलच्या दुस-या आठवड्यात एअर एशियाच्या डीजीसीएला देशात सेवा देण्यासाठी परवानगी मिळेल, अशी आशा आहे.
० हवाई वाहतूक उद्योगाचा गेल्या वर्षी घसरलेला विकास या वर्षी दोन आकड्यांपर्यंत पोहोचेल, अशी आशा.
नोकरी
एअर एशियाच्या येण्यामुळे हवाई वाहतूक उद्योगातील नोकरीत सकारात्मक वाढ होईल. किंगफिशर आणि एअर इंडियामुळे नोक-यांत कपात झाली होती.


आमची सेवा स्वस्त प्रवासावर केंद्रित असेल. याशिवाय आशियातील अन्य देशांच्या प्रवासासाठी येथील प्रवाशांना आकर्षक सवलत देऊ. मिठ्ठू चांडलिया सीईओ, एअर एशिया इंडिया